मराठी बातम्या  /  क्रीडा  /  LSG vs CSK IPL 2023 : निवडणुकीमुळे आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल, लखनौ-चेन्नई सामन्याची तारीख बदलली

LSG vs CSK IPL 2023 : निवडणुकीमुळे आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल, लखनौ-चेन्नई सामन्याची तारीख बदलली

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 18, 2023 05:17 PM IST

LSG vs CSK IPL 2023 : पालिका निवडणुकीमुळं चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स या संघातील सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे.

LSG vs CSK Schedule In IPL 2023
LSG vs CSK Schedule In IPL 2023 (PTI)

LSG vs CSK Schedule In IPL 2023 : यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघाचे चार सामने झाल्यानंतर स्पर्धेत चांगलीच चुरस निर्माण होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून होणारे प्रत्येक सामने अखेरच्या षटकापर्यंत जात आहेत. त्यामुळं आता प्ले ऑफमध्ये सर्वात आधी कोणता संघ जाणार, याबाबत चाहत्यांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहे. परंतु आता यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच एका नियोजित सामन्याच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स या संघांमध्ये येत्या चार मे राजी होणारा सामना तीन मे राजी होणार आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ शहरातील अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. परंतु चार मे रोजी लखनौ महापालिकेची निवडणूक असल्यामुळं आयपीएलच्या वेळापत्रका मोठा बदल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएलच्या प्रशासकीय समितीने याबाबत एक निवेदन जारी करत माहिती दिली आहे. सीएसके आणि एलएसजी संघातील सामना लखनौतील स्टेडियमवर होणार असून तो नियोजित तारखेपेक्षा एक दिवस आधी म्हणजेच तीन मे राजी होणार असल्याचं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळं आता चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्समधील सामना नियोजित वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. लखनौतील महापालिकेच्या निवडणुकीवेळी सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएलच्या प्रशासकीय समितीनं सामन्याची तारीख बदलण्याची घोषणा केली आहे. मतदानाच्या दिवशीच आयपीएलच्या सामन्यात कोणताही राजकीय गोंधळ होऊ नये, यासाठी आयपीएलचा सामना एक दिवस आधी होणार असल्याचं बोललं जात आहे.

RCB vs CSK : सीएसकेविरुद्ध आक्षेपार्ह सेलिब्रेशन करणं भोवलं, विराट कोहलीला लाखोंचा दंड

चेन्नई सुपर किंग्जची लखनौवर बाजी...

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांमध्ये एक सामना झालेला आहे. त्यात दोनशेपार धावा करून सीएसकेने लखनौला आस्मान दाखवलेलं आहे. त्यामुळं आता सामन्याचं बदललेलं वेळापत्रक कोणत्या संघाला फायदेशीर ठरणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

WhatsApp channel