मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB vs CSK : सीएसकेविरुद्ध आक्षेपार्ह सेलिब्रेशन करणं भोवलं, विराट कोहलीला लाखोंचा दंड

RCB vs CSK : सीएसकेविरुद्ध आक्षेपार्ह सेलिब्रेशन करणं भोवलं, विराट कोहलीला लाखोंचा दंड

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 18, 2023 04:36 PM IST

Virat Kohli Fined IPL : चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी विराट कोहली दोषी आढळला आहे.

Royal Challengers Bangalore's Mohammed Siraj, left, celebrates with teammate Virat Kohli after the dismissal of Chennai Super Kings' Ruturaj Gaikwad during the Indian Premier League cricket match between Royal Challengers Bangalore and Chennai Super Kings in Bengaluru, India, Monday, April 17, 2023. (AP Photo/Aijaz Rahi)
Royal Challengers Bangalore's Mohammed Siraj, left, celebrates with teammate Virat Kohli after the dismissal of Chennai Super Kings' Ruturaj Gaikwad during the Indian Premier League cricket match between Royal Challengers Bangalore and Chennai Super Kings in Bengaluru, India, Monday, April 17, 2023. (AP Photo/Aijaz Rahi) (AP)

Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings : मुंबई इंडियन्सला पराभूत करत यंदाच्या आयपीएलची धमाकेदार सुरुवात करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने घरच्या मैदानावर धुळ चारली आहे. फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी खेळीनंतरही आरसीबीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. विराट कोहली सीएसकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात स्वस्तात बाद झाल्याचा फटका आरसीबीला बसला. परंतु आता पराभवानंतरही आरसीबीला मोठा झटका बसला आहे. सीएसकेचा शिवम दुबे बाद झाल्यानंतर विराट कोहलीने आक्षेपार्ह सेलिब्रेशन केल्यामुळं आयपीएलच्या प्रशासकीय समितीने कोहलीच्या सामन्यातील मानधनात १० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकं प्रकरण काय आहे?

चेन्नई सुपरकिंग्जचे फलंदाज डेव्हॉन कॉन्व्हे आणि शिवम दुबे जोरदार फटकेबाजी करत होते. आरसीबीच्या प्रत्येक गोलंदाजाला फटके बसत असतानाच मोहम्मद सिराजचा चेंडू मैदानाबाहेर टोलवताना शिवम दुबे चुकला आणि विराट कोहलीने त्याचा अप्रतिम झेल पकडला. त्यानंतर विराट कोहलीने जोरदार सेलिब्रेशन करत सीएसकेच्या फलंदाजांना डिवचलं. या प्रकरणात आयपीएलकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. परंतु आयपीएलच्या प्रशासकीय समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत विराट कोहलीला लेव्हल १ नुसार दोषी ठरवलं आहे. त्यामुळं आता कोहली मानधनातील केवळ ९० टक्के इतकीच रक्कम मिळणार आहे.

Andre Russell IPL 2023 : खराब फॉर्ममुळे आंद्रे रसेल आयपीएलमधून बाहेर होणार?, केकेआर मोठ्या निर्णयाच्या तयारीत

थरारक सामन्यात सीएसकेच्या विजय...

आरसीबीला विजयासाठी अखेरच्या षटकात २१ धावांची गरज होती. सुयश प्रभूदेसाई हा एकटाच फलंदाज क्रीझवर होता. परंतु सीएसकेच्या गोलंदाजांनी वेन पार्नेल, वानिंदु हसरंगा आणि सुयशला तंबूत पाठवून सीएसकेचा विजय साजरा केला. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यांचं लवकर बाद होणं आरसीबीला चांगलंच महागात पडलं आहे. त्यामुळं आता पाचपैकी तीन सामन्यांमध्ये पराभव झाल्यामुळं आरसीबीची स्पर्धेतील वाटचाल खडतर होण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel