मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Andre Russell IPL 2023 : खराब फॉर्ममुळे आंद्रे रसेल आयपीएलमधून बाहेर होणार?, केकेआर मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Andre Russell IPL 2023 : खराब फॉर्ममुळे आंद्रे रसेल आयपीएलमधून बाहेर होणार?, केकेआर मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 18, 2023 04:00 PM IST

Andre Russell News Update : आयपीएल सुरू झाल्यापासून आंद्र रसेलच्या बॅटमधून धावा निघत नसल्यामुळं केकेआर त्याला ड्रॉप करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Andre Russell In IPL 2023
Andre Russell In IPL 2023 (AFP)

Andre Russell In IPL 2023 : यंदाच्या आयपीएलमध्ये तब्बल आठ संघातील अनेक दिग्गज खेळाडू दुखापतीमुळं संघाबाहेर झाले आहे. काही खेळाडूंना सातत्यानं संधी मिळत असली तरी ते फॉर्मात नसल्यामुळं चाहत्यांच्या पदरी निराशा पडत असल्याचं पाहायला मिळत आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून कोलकाता नाईट रायडर्सचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याला संघासाठी फार काही विशेष करता आलेलं नाही. त्यामुळं आता आंद्रे रसेलला केकेआरमधून ड्रॉप करण्याची मागणी केली जात असातानाच आता केकेआर मोठ्या निर्णयाच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. केकेआरचा माजी कर्णधार इयान मॉर्गनने याबाबतचा मोठा खुलासा केला आहे.

केकेआरकडून खेळताना आयपीएलच्या पहिल्या पाच सामन्यांमध्ये आंद्रे रसेलची बॅट तळपलेली नाही. अनेकदा त्याला दोनआकडी स्कोरही गाठता आलेला नाही. याशिवाय गोलंदाजीतही तो सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळं त्याला आयपीएलमधून बाहेर करण्याची मागणी चाहत्यांकडून होत असतानाच केकेआरचा माजी कर्णधार इयान मॉर्गनने आंद्रे रसेलची पाठराखण केली आहे. आंद्रे रसेलचा फॉर्म खराब असला तरी त्याला आम्ही ड्रॉप करण्याच्या विचारात नाही, त्याला चांगली कामगिरी करण्यासाठी आणखी संधी दिल्या जातील, असं मॉर्गनने म्हटलं आहे.

IPL 2023 : षटकार ठोकण्यात माहीर आहे CSK आणि RCB; दुसऱ्यांदा केला जगावेगळा विक्रम

रसेलचा फॉर्म खराब असला तरी आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार आहोत. त्याला केकेआरमधून बाहेर जाताना आम्हाला पाहायचं नाहीये. केकेआर सध्या कोणत्याही कॅरेबियन क्रिकेटरवर अवलंबून नाही, परंतु आंद्रे रसेल आयपीएलमधून बाहेर होईल, अशी कोणतीही स्थिती सध्या नाही. मागच्या आयपीएलमध्ये त्याने केकेआरसाठी चांगल्या धावा केल्या होत्या. त्यामुळं रसेल सारखा खेळाडू कधीही फॉर्मात परतू शकतो, हे विसरून चालणार नाही, असं म्हणत केकेआरचा माजी कर्णधार इयान मॉर्गनने आंद्रे रसेलची पाठराखण करत त्याला संघातून बाहेर केलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

WhatsApp channel