मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : षटकार ठोकण्यात माहीर आहे CSK आणि RCB; दुसऱ्यांदा केला जगावेगळा विक्रम

IPL 2023 : षटकार ठोकण्यात माहीर आहे CSK आणि RCB; दुसऱ्यांदा केला जगावेगळा विक्रम

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 18, 2023 01:18 PM IST

CSK vs RCB IPL 2023 : आयपीएल स्पर्धेतील २४ व्या सामन्यात सीएसके आणि आरसीबीनं पुन्हा एकदा अनोखा विक्रम नोंदवला आहे.

CSK vs RCB
CSK vs RCB (AFP)

CSK vs RCB IPL 2023 : आयपीएल स्पर्धा जसजशी पुढं सरकते आहे, तसतसे नवनवीन विक्रम रचले जात आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमवर काल झालेल्या सीएसके विरुद्ध आरसीबीच्या सामन्यात षटकारांचा पाऊस पडला. दोन्ही संघांनी मिळून तब्बल ३३ षटकार मारले. एकाच सामन्यात ३३ षटकार मारले जाण्याची ही तिसरी वेळ होती. या कामगिरीमुळं सीएसके आणि आरसीबीच्या संघाच्या नावावर जगावेगळा विक्रम नोंदवला गेला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएलमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ३३ षटकारांचा आहे. आतापर्यंत तीन सामन्यांत हे घडलं आहे. यापैकी दोन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) हेच दोन संघ समोरासमोर होते. तर, सीएसके हा संघ तिन्ही वेळेला या विक्रमात सहभागी होता.

CSK vs RCB IPL 2023 : धोनीची 'ती' घोडचूक सीएसकेला महागात पडली असती, पण…

२०१८ मध्ये बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB आणि CSK यांच्यात झालेल्या सामन्यात ३३ षटकार मारले गेले. आयपीएलमधील सर्वाधिक षटकारांचा हा पहिला विक्रम होता. या सामन्यात दोन्ही संघांनी २०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं CSK साठी नाबाद ७० धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. त्यानं एकट्यानं सात षटकार मारले होते.

२०२० मध्ये शारजाहमध्ये सीएसके आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात ३३ षटकार मारले गेले. त्या सामन्यातही दोन्ही संघांनी २०० धावांचा टप्पा गाठला होता. त्या सामन्यात धोनीनं १७ चेंडूत २९ धावा आणि तीन षटकार ठोकले. या सामन्यात CSK ला १६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

IPL 2023 Points Table : आरसीबीच्या पराभवानं पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल, सीएसकेनं घेतली मोठी झेप, पाहा

सर्वाधिक षटकारांच्या याच विक्रमाची पुनरावृत्ती चालू सीझनमध्ये (२०२३) कालच्या सामन्यात झाली. आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यात ३३ षटकार मारले. आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलनं ७६ धावा काढताना सर्वाधिक ८ षटकार ठोकले. तर, सीएसकेसाठी डेव्हन कॉनवेनं सर्वाधिक ६ षटकार ठोकले. त्यानं ४५ चेंडूंत ८३ धावांची धडाकेबाज खेळी केली. CSK नं २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात २२६ धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल RCB चा संघ २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावाच करू शकला.

WhatsApp channel

विभाग