मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CSK vs RCB IPL 2023 : धोनीची 'ती' घोडचूक सीएसकेला महागात पडली असती, पण…

CSK vs RCB IPL 2023 : धोनीची 'ती' घोडचूक सीएसकेला महागात पडली असती, पण…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 18, 2023 10:25 AM IST

MS Dohini in CSK vs RCB IPL 2023 : आरसीबी विरुद्धच्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं केलेली एक चूक सीएसकेच्या पराभवाला कारणीभूत ठरली असतील. मात्र, तसं झालं नाही.

M S Dhoni
M S Dhoni

IPL 2023 : आयपीएल स्पर्धेतील २४ वा सामना सोमवारी चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super kings) जिंकला. आरसीबीनं (Royal Challengers Bangalore) अखेरपर्यंत लढत दिली, मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. सीएसकेनं हा सामना जिंकला असला तरी संघाकडून अनेक चुका झाल्या. खुद्द महेद्रसिंह धोनीनं (M S Dhoni) सामन्यात एक घोडचूक केली होती, ज्यामुळं हा सामनाच सीएसकेच्या हातून गेला असता. पण कसाबसा विजय मिळाला.

ट्रेंडिंग न्यूज

कालचा दिवस चेन्नई सुपर किंग्ज अर्थात CSK साठी वाईट दिवस होता. चिन्नास्वामी स्टेडियमवरची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती, मात्र सीएसकेचे गोलंदाजही कमी पडले. त्यामुळं आरसीबीनं अक्षरश: खोऱ्यानं धावा काढल्या. सीएसकेच्या खेळाडूंनी ४ झेल सोडले. खुद्द एमएस धोनीनंही एक झेल सोडला.

IPL 2023 Points Table : आरसीबीच्या पराभवानं पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल, सीएसकेनं घेतली मोठी झेप, पाहा

चेन्नई सुपर किंग्जकडून महेश थीक्षणानं दोन झेल सोडले, तर ऋतुराज गायकवाडनं प्रत्येकी एक झेल सोडला. याचा अर्थातच चेन्नईला फटका बसला. मात्र, चाहत्यांना खरा धक्का तेव्हा बसला, जेव्हा महेंद्रसिंग धोनीनं यष्टीमागे एक सोपा झेल सोडला. यष्टीमागे अत्यंत कठीण झेल घेण्यासाठी धोनी ओळखला जातो. हा झेल त्या तुलनेत सोपा होता. मात्र, चुकीची हालचाल त्याला महागात पडली आणि आरसीबीला चौकार मिळाला.

धोनीनं फाफ डुप्लेसिसचा झेल सोडला, त्यावेळी तो ५० धावांवर खेळत होता. त्यानं या सामन्यात ६२ धावा केल्या आणि शेवटी धोनीनंच त्याचा झेल टिपला. फाफ आणखी थोडा वेळ खेळपट्टीवर टिकून राहिला असता तर सामना २० व्या षटकापर्यंत गेलाच नसता. तो अतिशय आक्रमक फलंदाजी करत होता. ग्लेन मॅक्सवेल त्याला साथ देत होता. आरसीबीला शेवटच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज होती, परंतु संघ केवळ १० धावा करू शकला आणि ८ धावांच्या फरकानं सामना गमावला. सीएसकेनं २२६ धावा केल्या.

WhatsApp channel

विभाग