Haryana : लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या यूट्यूबर जोडप्यानं उचललं टोकाच पाऊल! ७ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Haryana : लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या यूट्यूबर जोडप्यानं उचललं टोकाच पाऊल! ७ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

Haryana : लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या यूट्यूबर जोडप्यानं उचललं टोकाच पाऊल! ७ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

Apr 14, 2024 03:13 PM IST

youtuber couple suicide in haryana : दिल्लीच्या शेजारी असलेल्या हरियाणातील (haryana news) बहादूरगडमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जोडप्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. २५ वर्षीय गरवित आणि २२ वर्षीय नंदिनी अशी मृतांची नावे आहेत.

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या यूट्यूबर जोडप्याने उचलले धक्कादायक पाऊल! ७ व्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन
लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या यूट्यूबर जोडप्याने उचलले धक्कादायक पाऊल! ७ व्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

youtuber couple suicide in haryana : दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील बहादूरगडमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जोडप्याने संशयास्पद स्थितीत एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गरवित सिंग गॅरी (वय २५) आणि नंदिनी कश्यप (वय २२) अशी मृत जोडप्याची नावे आहेत. हे दोघेही उत्तराखंडमधील डेहराडून येथील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघेही या इमारतीतील फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला आले होते.

Chandrapur Food Poisoning: चंद्रपुरात महाप्रसादातून १२५ जणांना विषबाधा! एकाचा मृत्यू; काहींची प्रकृती गंभीर

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, झज्जर जिल्ह्यातील बहादूरगड येथील रुहिल रेसिडेन्सी सोसायटीत राहणाऱ्या एका जोडप्याने शनिवारी सकाळी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गरवित आणि त्याची लिव्ह-इन पार्टनर नंदिनी युट्यूबवर स्वतःचे चॅनल चालवायचे आणि त्यासाठी शॉर्ट फिल्म्सही बनवायचे. काही दिवसांपूर्वीच हे दोघेही आपल्या क्रू मेंबर्ससह डेहराडूनहून बहादूरगडला आले होते. त्यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावर एक अपार्टमेंट भाड्याने घेऊन पाच मित्रांसह या ठिकाणी राहत होते.

BJP Manifesto: मोदींची गॅरंटी! तीन कोटी नवीन घरे, शून्य वीज बिल; भाजपच्या जाहीरनाम्यात नेमकी कोणती आश्वासने? वाचा

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून आले की हे जोडपे शुक्रवारी रात्री उशिरा घरी परतले होते. दोघांमध्ये काही मुद्द्यावरून वाद झाला. त्यानंतर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोघांनीही इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून खाली उडी मारून आमहत्या केली. पोलिसांनी सांगितले की, या जोडप्याला जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

Loksabha Election : महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही ठिकाणी मतदान करतात १४ गावातील ४ हजार मतदार! नेमकं प्रकरण काय ? वाचा

त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचे तपास अधिकारी जगबीर सिंग यांनी सांगितले की, कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. आम्ही घटनेचा तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळ गाठून पुरावे गोळा केले. सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर