Loksabha Election News : महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या १४ गावांतील सुमारे ४ हजार मतदार दोन्ही राज्यात मतदानाचा हक्क बाजवतात. ऐवढेच नाही तर या दोन्ही राज्यातील सुख सुविधांचा लाभ देखील घेतात. महाराष्ट्रातील चंद्रपूर मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. तर तेलंगणातील आदिलाबाद मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही मतदान प्रक्रियेत दोन्ही राज्याच्या सीमेवरील १४ गावांतील तब्बल ४ हून अधिक मतदार दुबार मतदान करणार आहेत.
महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या सीमावादामुळे सीमेवरील ६ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या दुर्गम भागात असलेल्या या १४ गावांमध्ये दोन्ही राज्यांकडून प्रशासकीय कार्यालये स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी दोन्ही राज्यातर्फे वीज, पाणी, रेशनकार्ड या सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयापासून ते सरपंचापासून ते प्राथमिक सरकारी शाळा (मराठी आणि तेलुगु) व आरोग्य सेवा केंद्रे बांधण्यात आले आहेत.
तेलंगणातील आदिलाबादच्या केरामरी तहसील आणि महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या जिवती तहसीलमध्ये येणाऱ्या १४ गावांचा सीमावाद हा १९५६ चा आहे. जेव्हा आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्रात या गावांना साडेबारा गावे म्हणतात. दोन ग्रामपंचायती (परंडोली आणि अंतपूर) अंतर्गत ही १४ गावे येतात. ही गावे ३० किमी अंतराच्या परिघात आहेत. या १४ गावातील ग्रामस्थांकडे दोन मतदार ओळखपत्रे आहेत. त्यांची नावे दोन्ही राज्यातील मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये आहेत.
एवढेच नाही तर प्रत्येक गावकऱ्यांकडे दोन रेशनकर, आधार कार्ड, मनरेगा कार्ड, जात प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे देखील आहेत. यापैकी एक महाराष्ट्रातील आणि एक तेलंगणातील आहे. यामुळे या लोकांना दोन्ही राज्यांच्या सामाजिक कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येतो.
दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये फरक एवढाच की, परंडोली अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांना दोन्ही राज्यातून पाणी आणि वीजपुरवठा देखील करण्यात येतो. अंतापूर अंतर्गत येणाऱ्या पाच गावांतील रहिवाशांचे म्हणणे आहे की, त्यांना फक्त तेलंगणाच पाणी आणि वीज देत आहे आणि तेही मोफत. सध्या परंडोली आणि अंतपूर ग्रामपंचायतींसाठी निवडून आलेले दोन सरपंच हे महाराष्ट्र आणि तेलंगणातील वेगवेगळ्या पक्षांचे आहेत. यामुळे विकासकामे पूर्ण करण्यासाठी त्यांना दोन्ही राज्य सरकारकडून स्वतंत्र निधीही मिळतो. गावकरी बहुतेक अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) समुदायातील आहेत. त्यांच्याकडे दोन्ही राज्यांची शिधापत्रिका आहेत, ते रेशनचा लाभ तसेच दोन्ही राज्यांद्वारे राबविण्यात येत असलेल्या इतर योजनांचा लाभ घेऊ शकतात.
परंडोलीच्या सरपंच लीनाबाई बिराडे या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सदस्या आहेत. त्यांचे पती भरत म्हणाले, "आम्ही प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दोन्ही राज्यात मतदान करत आलो आहोत. आमच्याकडे दोन्ही राज्य सरकारने व त्यांच्या प्रशासकिय यंत्रणेने मतदार ओळखपत्रे दिली आहेत. दोन्ही ठिकाणी निवडणुका झाल्या तर येथील तारीख देखील एकच आहे, त्यामुळे ज्या राज्यात शक्य असेल तिथे मतदान करतो, पण एकाच तारखेला मतदान झाले नाही तर दोन्ही बाजूंनी आम्ही मतदान करतो. कारण आम्हाला कारण आम्हाला दोन्ही बाजूंनी सुविधा मिळतात.
ग्रामस्थांच्या दुहेरी मतदानाच्या मुद्द्यावर, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले की, दोन्ही जिल्ह्यांच्या (महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि तेलंगणातील आदिलाबाद) प्रशासकीय अधिकाऱ्यांची नुकतीच या संदर्भात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत दोन्ही जिल्ह्यातील मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. तसेच नागरिकांना दुबार मतदान करू नका असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
परंडोलीच्या एका सरपंचाने या संदर्भात दर्शवत म्हटले की, त्यांची गावे कोणत्या राज्यातील आहेत हे सरकारने आधी ठरवावे. ते म्हणाले, "दोनदा मतदान करणे कायद्यानुसार चुकीचे असले तरी निवडणूक आयोगाने राज्यांना आधी आमचा प्रश्न सोडवायला सांगू द्या. आम्ही दोन्ही बाजूंनी मतदान करत आहोत. तुम्हाला त्यात काही अडचण असेल, तर निवडणूक आयोगाने आम्हाला विचारावे. एका मतदारसंघाच्या यादीतून आमचे नाव काढून टाकावीत.