मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson : खटक्यावर बोट जाग्यावर पलटी… लिव्हिंगस्टोनला धावबाद करताना संजू सॅमसनने दाखवली चित्त्याची चपळाई, पाहा

Sanju Samson : खटक्यावर बोट जाग्यावर पलटी… लिव्हिंगस्टोनला धावबाद करताना संजू सॅमसनने दाखवली चित्त्याची चपळाई, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 14, 2024 11:57 AM IST

Sanju Samson-Liam Livingstone Video : आयपीएल २०२४ च्या २७व्या सामन्यात राजस्थानच्या क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त कामगिरी केली. यावेळी विकेटकीपर आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने एक उत्कृष्ट रनआऊट करून दाखवले.

Sanju Samson-Liam Livingstone Video खटक्यावर बोट जाग्यावर पलटी… लिव्हिंगस्टोनला धावबाद करताना संजू सॅमसनने दाखवली चित्त्याची चपळाई, पाहा
Sanju Samson-Liam Livingstone Video खटक्यावर बोट जाग्यावर पलटी… लिव्हिंगस्टोनला धावबाद करताना संजू सॅमसनने दाखवली चित्त्याची चपळाई, पाहा

आयपीएल २०२४ च्या २७व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा शेवटच्या षटकात पराभव केला. या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. यामुळेच पंजाबला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा ६ सामन्यांमधला हा पाचवा विजय असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्जचा ६ सामन्यांतील हा चौथा पराभव ठरला.

तत्पूर्वी, राजस्थानच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्जला केवळ १४८ धावांवर रोखले. पंजाबविरुद्ध आयपीएल पदार्पण करणाऱ्या केशव महाराजने याच सामन्यात आयपीएलची पहिली विकेट घेतली, त्याने दोन बळी घेतले. तर अवेश खाननेही ३२ धावांत २ विकेट घेतल्या.

सोबतच, या सामन्यात राजस्थानच्या क्षेत्ररक्षकांनीही जबरदस्त कामगिरी केली. यावेळी विकेटकीपर आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने एक उत्कृष्ट रनआऊट करून दाखवले.

संजूने पंजाबचा स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनला मोक्याच्या क्षणी धावबाद केले. लिव्हिंगस्टोन बाद झाल्याने पंजाबचा संघ १५० च्या आत मर्यादित राहिला. सॅमसनने १८ व्या षटकात लियाम लिव्हिंगस्टनला धावबाद केले. त्यावेळी तो १४ चेंडूत २१ धावांवर खेळत होता आणि आक्रमक फटके मारत होता. जर लियाम लिव्हिंगस्टोन बाद झाला नसता तर पंजाबने आणखी २५-३० धावा केल्या असत्या.

युझवेंद्र चहलच्या षटकात ही घटना घडली

इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या आशुतोष शर्माने युझवेंद्र चहलचा चेंडू डीप मिडविकेटवर खेळला आणि धाव घेतली. लिव्हिंग्स्टनने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण आशुतोषला त्यात रस नव्हता आणि त्याने लिव्हिंगस्टोनला स्ट्राइक एंडला परत पाठवले.

तनुष कोटियनचा दिशाहीन थ्रो

पण तेवढ्यात फिल्डर तनुष कोटियनने सॅमसनकडे थ्रो केला. पण चेंडू विकेटकीपर सॅमसनपासून थोडा दूर होता, अशाही स्थितीत संजू सॅमसनने चेंडू बॉल पडला आणि डाईव्ह मारत स्टंपवर फेकला. रिप्लेमध्ये लिव्हिंगस्टन पांढऱ्या रेषेपेक्षा एक इंच मागे असल्याचे दिसले. यानंतर थर्ड अंपायरने त्याला रन आऊट घोषित केले.

सामन्यात काय घडलं?

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १४७ धावा केल्या होत्या. यादरम्यान आशुतोष शर्माने १६ चेंडूत ३१ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि १ चौकार लगावला.

प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्ससाठी इम्पॅक्ट प्लेयर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ३९ धावा केल्या, ज्यात ४ चौकारांचा समावेश होता. तर हेटमायरने १० चेंडूत २७ धावा करून नाबाद राहिला.

हेटमायरने आपल्या खेळीत ३ षटकार आणि १ चौकार लगावला. तनुष कोटियनने २४ धावांची तर रियान परागने २३ धावांची खेळी केली. पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडा आणि सॅम करन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

IPL_Entry_Point