Indian railway google translate viral news : भाषांतर करतांना अनेक वेळा गुगल ट्रान्सलेटची मदत घेतली जाते. मात्र, हे भाषांतर तंतोतंत होत नसल्याने अनेकदा शब्दाचा अर्थ बदलून अनर्थ होतो. हा अनर्थ भारतीय रेल्वे सोबत घडल्याची एक घटना पुढे आली आहे.
रेल्वेने गूगल ट्रान्सलेटर वापरून एका एक्सप्रेस रेल्वेचे नाव बदलले. मात्र, गुगल ट्रान्सलेट झालेल्या शब्दाचा अर्थ अधिकाऱ्यांना न समजल्याने प्रवासी मात्र चांगलेच भडकले आहेत. बदललेल्या शब्दाचा अर्थ मर्डर ट्रेन असा झाला असून हे नाव गाडीवर झळकले आहे. हे नाव वाचून प्रवासी भडकले आहेत. रेल्वेने झालेली चूक मान्य करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय रेल्वेने मल्याळम भाषेतील एका स्थानकाचे नाव बदलले. हे नाव बदलतांना भाषांतरात मोठी चूक झाली आहे. गुगल ट्रान्सलेट करतांना हाटीया स्टेशनचे नाव हत्या स्टेशन झाले. या नावाचा बोर्ड रेल्वेवर लावण्यात आला आहे. हा बोर्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे नाव वाचून नागरिक संतप्त झाले आहेत. प्रवाशांनी या घटनेचा निषेध केल्यावर रेल्वे प्रशासनाला त्यांची चूक लक्षात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेसवर ‘हटिया’ नावाचा बोर्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा बोर्ड व्हायरल झाल्यावर भारतीय रेल्वेला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. रेल्वेने हटियाचे मल्याळममध्ये "कोलापथकम" असे भाषांतर केले. ज्याचा हिंदीत अर्थ आहे- खून करणारा व्यक्ति.
एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'हत्या' म्हणजेच 'खून' या हिंदी शब्दाच्या गोंधळामुळे ही चूक झाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत मल्याळम शब्द पिवळ्या रंगाने झाकून टाकला. हटिया हे रांचीमधील ठिकाण आहे. हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेस साप्ताहिक गाडी असून टी हटीया आणि एर्नाकुलम या दोन्ही शहरांना जोडते.
वरिष्ठ विभागीय कमर्शियल मॅनेजर (Sr. DCM), रांची विभाग, यांनी शब्दांत झालेली चूक मान्य केली आहे. भाषांतर करताना ही चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे. हा नामफलक चुकीचा असून ही चूक समोर आल्यानंतर ती दुरुस्त करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर हा मर्डर ट्रेनचा बोर्ड व्हायरल झाल्यावर चित्र समोर आल्यानंतर लोक संतापले. हा फोटो व्हायरल झाल्यावर अनेकांनी यावर पोस्ट लिहिल्या आहेत. या पोस्टवर टिप्पणी करताना, एका वापरकर्त्याने लिहिले, "गुगल ट्रान्सलेटवर भारतीय रेल्वे अधिकारी अवलंबून असणे हे धोकादायक आहे.
संबंधित बातम्या