मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Raj Kundra Property seized : मोठी बातमी! शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याची ९७ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

Raj Kundra Property seized : मोठी बातमी! शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याची ९७ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 18, 2024 01:21 PM IST

raj kundra property seized :अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर सक्तवसुली संचालनालयानं (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीनं कुंद्रा याची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राची ९७ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीनं केली कारवाई
शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राची ९७ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीनं केली कारवाई

ed seized shilpa shetty husband raj kundra property : ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (shilpa shetty) पती तसेच व्यापारी राज कुंद्रा यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने कुंद्रा यांची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. २०२१ साली उघडकीस आलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणात कुंद्रा यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना जामीन मिळाला.

ट्रेंडिंग न्यूज

gst on laccha paratha : लच्छा पराठ्यावरील कराचा वाद थेट हायकोर्टात! न्यायाधीशांनी दिला 'हा' निर्णय

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीने कुंद्राच्या ज्या मालमत्ता जप्त केल्या आहेत त्यात शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याचाही समावेश आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLA, 2002 अंतर्गत कुंद्रायांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिल्पा शेट्टीची इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सच्या संघात देखील भागीदारी आहे.

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा सुटला! भाजपकडून नारायण राणे यांच्या नावाची घोषणा

या प्रकरणात झाली कारवाई

बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीने कुंद्रा यांच्यावर कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये पुण्यातील बंगला आणि इक्विटी शेअर्सचाही समावेश आहे. ईडीने महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलीसांतर्फे वन व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

medicines in grocery stores : आता किराणा दुकानातही मिळणार सर्दी-खोकल्यावरील औषधे! लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता

आरोपींनी बिटकॉइन्सच्या रूपात लोकांकडून पैसे गोळा केले होते. व बिटकॉइन्सच्या रूपात दरमहा १० टक्के रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले असल्याचा आरोप आहे. या मध्यमातून आरोपींनी मोठ्या प्रमाणात रक्कम लुटली असल्याचे तपसात पुढे आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, कुंद्रा यांनी युक्रेनमध्ये खाण फार्म उभारण्यासाठी गेन बिटकॉइनचे प्रवर्तक आणि मास्टरमाइंड अमित भारद्वाज यांच्याकडून २८५ बिटकॉइन्स घेतले होते. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  

IPL_Entry_Point

विभाग