EPFO: मोठी बातमी! वैद्यकीय उपचारांसाठी आता पीएफमधून दुप्पट पैसे मिळणार, अर्ज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खात्यात जमा होणार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPFO: मोठी बातमी! वैद्यकीय उपचारांसाठी आता पीएफमधून दुप्पट पैसे मिळणार, अर्ज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खात्यात जमा होणार

EPFO: मोठी बातमी! वैद्यकीय उपचारांसाठी आता पीएफमधून दुप्पट पैसे मिळणार, अर्ज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खात्यात जमा होणार

Apr 18, 2024 10:43 AM IST

EPF withdrawal limit for medical emergency : वैद्यकीय खर्चासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून मिळणाऱ्या आगाऊ रकमेत दुपटीनं वाढ करण्यात आली आहे.

मोठी बातमी! वैद्यकीय उपचारांसाठी आता पीएफमधून दुप्पट पैसे मिळणार, अर्ज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खात्यात जमा होणार
मोठी बातमी! वैद्यकीय उपचारांसाठी आता पीएफमधून दुप्पट पैसे मिळणार, अर्ज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खात्यात जमा होणार

EPF medical withdrawal : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. वैद्यकीय उपचारांसाठी पीएफमधून मिळणाऱ्या रकमेची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. त्यानुसार आता पीएफ खातेधारक स्वतःच्या किंवा कुटुंबीयांच्या उपचारासाठी त्यांच्या खात्यातून १ लाख रुपये काढू शकतात. यापूर्वी त्याची कमाल मर्यादा 50,000 रुपये होती.

केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी यास मंजुरी दिली असून १६ एप्रिलपासून नवीन नियम लागू करण्यात आला आहे. नव्या नियमाच्या अंमलबजावणीसाठी १० एप्रिल रोजी ईपीएफओनं अर्जाच्या सॉफ्टवेअरमध्येही आवश्यक ते बदल केले आहेत.

पीएफमधून पैसे काढण्यासाठी खातेदारांना कलम 68 J च्या अंतर्गत दावा करावा लागतो. कलम 68J अंतर्गत ईपीएफ खातेदार वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी पीएमधील पैसे काढू शकतात. याशिवाय, फॉर्म ३१ अंतर्गत, वेगवेगळ्या वेळी काही प्रमाणात पैसे काढण्याची तरतूद आधीपासूनच आहे. त्यानुसार लग्न, कर्जाची परतफेड, फ्लॅट किंवा घराचे बांधकाम इत्यादींसाठी पीएफमधून पैसे काढता येतात.

पीएमचे पैसे कधी काढता येतात?

EPFO कर्मचाऱ्यांना गंभीर आजार किंवा इतर वैद्यकीय उपचारांसाठी आगाऊ पैसे काढता येतात. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, खातेदार केवळ जीवघेण्या आजारांच्या बाबतीतच याचा वापर करू शकतात. तसंच, कर्मचारी किंवा त्याच्यावर अवलंबून असलेला रुग्ण शासकीय किंवा शासकीय संलग्न रुग्णालयात दाखल असावा लागतो. असतो. एखाद्या रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलं असेल, तर वैद्यकीय तपासणीनंतरच पैशासाठी अर्ज करता येऊ शकतो.

रुग्णालयाच्या खात्यावर थेट पैसे

वैद्यकीय खर्चापोटी मिळणाऱ्या निधीचा लाभ घेण्यासाठी नियमित कामकाजाच्या दिवशी अर्ज केल्यास, दुसऱ्याच दिवशी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. गरज भासल्यास थेट संबंधित रुग्णालयाच्या खात्यावर पैसे पाठवले जाऊ शकतात. रुग्णाचा डिस्चार्ज झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत उपचाराची स्लिप सबमिट करावी लागेल.

पीएफसाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल?

पीएफसाठी ऑनलाइन आगाऊ दावा करायचा असेल तर संस्थेच्या अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in ला भेट द्या.

तिथं लॉग इन केल्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा.

क्लेम फॉर्म ३१, १९, १० सी आणि १० डी भरा. यानंतर तुमच्या खात्याचे शेवटचे चार क्रमांक टाकून ते सत्यापित करा.

'प्रोसीड फॉर ऑनलाइन क्लेम' वर क्लिक करा. त्यानंतर पीएफचा आगाऊ फॉर्म ३१ भरा. खाते क्रमांक भरा आणि तुमच्या चेकची किंवा बँक पासबुकची फोटो कॉपी अपलोड करा.

आता तुमचा पत्ता टाका. त्यानंतर 'Get Aadhaar OTP' वर क्लिक करा आणि OTP मिळाल्यावर तो फॉर्ममध्ये टाका. तुमचा क्लेम पूर्ण होईल.

Whats_app_banner