medicines in grocery stores : सर्दी, खोकला, ताप यासाठी वापरण्यात येणारी औषधेही आता किराणा आणि जनरल स्टोअर्समध्ये देखील उपलब्ध करून देण्याच्या विचारात सरकार आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. ओटीसी अर्थात ओव्हर द काउंटर औषधांच्या धोरणावर काम करणारी समिती या प्रकारच्या सुचनेवर विचार करत आहे. या बाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी हा निर्णय लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भातवृत्त दिले आहे. अमेरिकेसारख्या अनेक देशांमध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या औषधे किराणा दुकानांत देखील उपलब्ध असतात. भारताच्या ओटीसी धोरणावर काम करणाऱ्या काही तज्ज्ञांकडूनही एक सूचना आली आहे, ज्यामध्ये भारतात देखील अशी औषधे ही किराणा दुकाने अथवा जनरल स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवता येईल. या मुळे ग्रामीण भागात औषधांचा पुरवठा हा सुधारला जाईल. असे असेले तरी या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
वास्तविक, ओटीसी ही अशी औषधे मानली जातात जी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जाऊ शकतात. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियातत या प्रकारच्या औषधांबाबतची मार्गदर्शक तत्त्वे अतिशय स्पष्ट आहेत. फेब्रुवारीमध्येच, आरोग्य सेवा महासंचालक अतुल गोयल यांनी तज्ञांची एक समिती स्थापन केली होती, ज्याला भारताचे ओटीसी औषध धोरण तयार करण्याचे काम सोपविण्यात आले होते.
काउंटरवर विकल्या जाणाऱ्या औषधांची पहिली यादीही समितीने सादर केल्याचे वृत्त आहे. या औषधांवर चर्चा करण्यासाठी सोमवारीच बैठक बोलावण्यात आली होती. अहवालानुसार, एका सूत्राने सांगितले की, 'भारतात प्रिस्क्रिप्शन औषधांची नियमावली आहे, परंतु काउंटरवर विकल्या जाऊ शकतात याची कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे किंवा यादी नाही.' ते पुढे म्हणाले, 'एखाद्या औषधावर केवळ प्रिस्क्रिप्शन औषध असे लेबल केलेले नसेल तर ते ओटीसी औषधे मानले जातात.
संबंधित बातम्या