lion sita akbar case : बंगालच्या प्राणी संग्रहालयातील सिंहाना मिळणार नवी ओळख! सीता, अकबर ऐवजी 'ही' नावे ठेवली जाणार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  lion sita akbar case : बंगालच्या प्राणी संग्रहालयातील सिंहाना मिळणार नवी ओळख! सीता, अकबर ऐवजी 'ही' नावे ठेवली जाणार

lion sita akbar case : बंगालच्या प्राणी संग्रहालयातील सिंहाना मिळणार नवी ओळख! सीता, अकबर ऐवजी 'ही' नावे ठेवली जाणार

Apr 18, 2024 07:22 AM IST

lion sita akbar case : पश्चिम बंगालमधील प्राणिसंग्रहालयात सिंह आणि सिंहिणीच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला होता. सिंहाचे नाव ‘अकबर’ आणि सिंहिणीचे नाव ‘सीता’ ठेवल्यामुळे यावर विश्व हिंदू परिषदेने यावर आक्षेप घेतला होता. हे प्रकरण कोर्टात पोहचले होते. या दोन्ही सिंहाची नावे आता बदलली जाणार आहेत.

बंगालच्या प्राणी संग्रहालयातील सिंहाना मिळाली नवी ओळख! सीता, अकबर ऐवजी 'ही' नावे ठेवली जाणार
बंगालच्या प्राणी संग्रहालयातील सिंहाना मिळाली नवी ओळख! सीता, अकबर ऐवजी 'ही' नावे ठेवली जाणार

lion sita akbar case : कोलकाता येथील बंगाली सफारी पार्कमध्ये सिंह-सिंहिणीची जोडीच्या नावावरून वादंग निर्माण झाले होते. सिंहिणीचे नाव सीता , तर सिंहाचे नाव अकबर असल्याने या नावावर विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी आक्षेप घेतला होता. सिंहिणीचे नाव बदलण्यासाठी विहिंपने कोलकाता उच्च न्यायालयात राज्याविरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान, कोर्टाने वादग्रस्त नावे टाळावीत असे आदेश दिल्यानंतर हे प्रकरण राज्य सरकारने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवले असून त्यांनी नवीन नावांचा प्रस्ताव पाठवला आहे.

Maharashtra Weather update: राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट! 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

सिंह आणि सिंहिणी अकबर आणि सीता यांच्या नावावरून वाद झाल्यानंतर आता त्यांना नवी ओळख देण्याची तयारी सुरू आहे. नवीन प्रस्तावानुसार सिंहाचे नाव सूरज आणि सिंहीणीचे नाव तनया असू शकते. मात्र, ही नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. नावांचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला होता. विश्व हिंदू परिषदेने (विहिप) सिंहिणी सीतेच्या नावावर आक्षेप घेतला होता.

राज्य सरकारने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे (CZA) नवीन नावांचा प्रस्ताव पाठवला आहे. खरे तर कोलकाता उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने वादग्रस्त नावे टाळावीत, असे म्हटले होते. यानंतर पश्चिम बंगालच्या प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून नवीन नावांचा प्रस्ताव सीझेडएकडे पाठवण्यात आला आहे.

Dubai Rains 2024: मुसळधार पावसात पर्यटन नगरी दुबई बुडाली! पाहा भयानक फोटो

हे प्रकरण फेब्रुवारी महिन्यात न्यायालयात पोहोचले तेव्हा न्यायमूर्ती सौगता भट्टाचार्य म्हणाले की, मी सिंहाला सम्राट अकबरचे नाव देण्याचे समर्थन करत नाही. राज्याचे अतिरिक्त महाधिवक्ता ज्योती चौधरी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते की, सरकारला सिंह आणि सिंहिणीची नावे बदलायची आहेत.

एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले की, ही नावे CZA कडे पाठवली गेली आहेत आणि आता ही नावे स्वीकारणे किंवा त्यांना दुसरी नवे देणे हे त्याच्यावर अवलंबून आहेत. 'नावे मंजूर झाल्यानंतर ती रेकॉर्डमध्ये ठेवली जातील. त्यानंतर जर या जोडप्याने शावकांना जन्म दिला तर सूरज आणि तानिया ही त्यांच्या पालकांची नावे लिहिली जातील.

Sangli Accident : सांगलीत लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेली क्रुझर लक्झरी बसवर आदळली, ७ जणांचा मृत्यू

१२ फेब्रुवारी रोजी सिलीगुडी येथील बंगाल सफारीमध्ये ७ वर्षाच्या सिंह आणि ६ वर्षाच्या सिंहिणीला आणण्यात आले होते. हे एका बदली कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आले. नावांवरील वादानंतर राज्य सरकारने त्रिपुरामध्ये नावे ठेवण्यात आल्याचे सांगितले होते. यानंतर त्रिपुराचे वन अधिकारी प्रवीण लाल अग्रवाल यांना निलंबित करण्यात आले.

विश्व हिंदू परिषेदेणे या नावावर आक्षेप घेतल्यानंतरत हे प्रकरण कोलकाता उच्च न्यायालयात जाऊन पोहोचले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सिंह आणि सिंहिणीची नावे बदलण्याचे आदेश दिले होते. सिंहाचे नाव ‘अकबर’ आणि सिंहिणीचे नाव ‘सीता’ ठेवल्यामुळे हा सर्व वाद निर्माण झाला आहे. विहिंपने याला भावना दुखावणारे पाऊल म्हटले होते. कोलकाता उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली, तेव्हा न्यायमूर्ती सौगता भट्टाचार्य यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या महाधिवक्त्यांना विचारले की, एखाद्या प्राण्याचे नाव देव, पौराणिक नायक, स्वातंत्र्यसैनिक किंवा नोबेल पारितोषिक विजेत्याच्या नावावर ठेवता येईल का? असा मलाच प्रश्न पडतो. पश्चिम बंगाल हे कल्याणकारी अन् धर्मनिरपेक्ष राज्य आहे. सीता आणि अकबराला सिंहाचे नाव देऊन वाद का निर्माण करताय? हा वाद टाळायला हवा होता, असंही न्यायमूर्ती म्हणाले. केवळ सीताच नाही तर मी कोणत्याही सिंहाला अकबर असे नाव देण्याचे समर्थन करीत नाही. तो एक अत्यंत कुशल आणि महान मुघल सम्राट होता. अत्यंत यशस्वी आणि धर्मनिरपेक्ष मुघल सम्राट होता. जर ते आधीच नाव दिले असेल तर राज्य प्राधिकरणाने ते बदलले पाहिजे, असंही न्यायमूर्तींनी अधोरेखित केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर