मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Pune Politics : पुण्यात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन! आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Pune Politics : पुण्यात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन! आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 18, 2024 08:55 AM IST

Pune loksabha election 2024 : पुण्यात आज महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जोरदार शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर सातारा, सांगली येथे देखील उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत.

पुण्यात महायुती व महाविकास आघाडीच्या  उमेदवारांचे जोरदार शक्ति प्रदर्शन! आज  उमेदवारी अर्ज दाखल करणार
पुण्यात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे जोरदार शक्ति प्रदर्शन! आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Pune loksabha election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे शहर येथील लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचेचे उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या पूर्वी मोठे शक्ति प्रदर्शन केले जाणार आहेत. बारामती येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असून दोघेही आज त्यांचे उमेदवारी अर्ज कौन्सिल हॉल येथे भरणार आहेत. तर शिरूरमधून अमोल कोल्हे आणि पुण्यातुन रवींद्र धंगेकर आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

lion sita akbar case : बंगालच्या प्राणी संग्रहालयातील सिंहाना मिळणार नवी ओळख! सीता, अकबर ऐवजी 'ही' नावे ठेवली जाणार

राज्यातील अनेक महत्वाच्या लोकसभा निवडणुकांच्या जागेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. आज प्रामुख्याने बारामती, शिरूर, सातारा, सांगली येथील उमेदवार त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असून दोघीही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर सातारा व सांगलीतही महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी मोठे शक्ति प्रदर्शन केले जाणार आहे.

Maharashtra Weather update: राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट! 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, रविद्र धंगेकर, सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदार संघातून पवार घराण्यात लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुनेत्रा पवार या आज पुण्यातील कौन्सिल हॉल येथील मधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करतील. सुप्रिया सुळे यांच्या सोबतच शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे व पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे दोघेही त्यांचे उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत. अमोल कोल्हे व रवींद्र धंगेकर हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करतील. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज साधारणपणे सकाळी ११ दरम्यान दाखल केले जातील.

nestle cerelac : लहान मुलांना नेस्लेचे दूध आणि सेरेलॅक देताय? तर ही बातमी वाचा! अहवालात धक्कादायक माहिती आली पुढे

महायुती आणि महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

दरम्यान, निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडी व महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज भरतांना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, खासदार संजय राऊत, जयंत पाटील तसेच अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहे.

पुण्यात महायुतीची जाहीर सभा

आज महायूतीकडून सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. त्यांचा अर्ज दाखल करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहे. यानंतर महायुतीची सभा होणार आहे.

अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांचे अजित पवार यांच्यासह दगदुशेठ गणपतीला साकडे

आज महायुती कडून सुनेत्रा पवार या अर्ज दाखल करणार आहेत. त्या पूर्वी आज सकाळी ७ वाजता अजित पवार यांच्यासह त्यांनी पुण्यातील दगडूशेठ मंदिरात जाऊन आरती करत साकडे घातले. या वेळी राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी त्यांच्या सोबत उपस्थित होते.

साताऱ्यातून उदयन राजे दाखल करणार अर्ज

साताऱ्यातून आज उदयन राजे भोसले हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांना भाजपकडून मंगळवारी उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. अर्ज दाखल केल्यावर उदयन राजे हे सभा घेणार आहेत.

WhatsApp channel