Maharashtra Weather update : राज्यात पुढील काही दिवस विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. प्रमुक्याने कोकणात आणि गोव्यात देखील तापमानात मोठी वाढ होणार आहे. हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या स्थितीमुळे गुजरातकडून कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत असून तर बंगालच्या उपसागरावरून छत्तीसगड तेलंगणामार्गे विदर्भातही आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत अशल्याने पुढील दोन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील खालच्या स्थरातील द्रोणीका रेषा विदर्भा पासून दक्षिण कर्नाटकापर्यंत मराठवाडा व उत्तर कर्नाटका पासून जात आहे. आज कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज कोकणात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य मध्य महाराष्ट्रात आज, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यात रात्री उकाडा जाणवेल. व मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर येथे आज तर बीडला आज आणि उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर नांदेड, लातूर, उस्मानाबादला पुढील दोन दिवस वादळी वारे आणि मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात १९ आणि २० एप्रिलला वादळी वारे आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. आज संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उद्या विदर्भ वगळता उर्वरित राज्यात तर १९,२० तारखेला कोकण, गोवा वगळता उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात आज आकाश अंशत: ढगाळ राहुल मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्या आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर उद्या आकाश मुख्यत: निरभ्र राहुल अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. तर सातारा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. तर, सांगली जिल्ह्याला गारपिटीने झाली.
राज्यात मालेगाव सर्वाधित तापमान असलेले गाव ठरले आहे. येथे तापमान हे ४३ अंशांवर गेले होते. त्यानंतर जेऊर (जि. सोलापूर), बीड येथेही तापमान ४३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर जळगाव, सोलापूर, वाशिम, अकोला येथे पारा हा ४२ अंश डिग्री सेल्सिअस होता. तर परभणी, नांदेड येथे तापमान हे ४१ अंश नोंदवल्या गेले.
मुंबईत देखील तापमान हे उष्ण राहणार आहे. तापमान हे साधारण ३८ ते ३९ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर निघणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.