मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  nestle cerelac : लहान मुलांना नेस्ले दूध आणि सेरेलॅक देता? मग ही बातमी वाचा! अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

nestle cerelac : लहान मुलांना नेस्ले दूध आणि सेरेलॅक देता? मग ही बातमी वाचा! अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 19, 2024 04:04 PM IST

nestle cerelac : भारतासह अनेक आफ्रिकी देशात देशांमध्ये लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या नेस्लेचे सेरेलॅक आणि दुधाच्या पावडरमध्ये नेस्ले भेसळ करत असल्याचे एका अहवालात आढळून आले आहे.

लहान मुलांना नेस्लेचे दूध आणि सेरेलॅक देताय? तर ही बातमी वाचा! अहवालात धक्कादायक माहिती आली पुढे
लहान मुलांना नेस्लेचे दूध आणि सेरेलॅक देताय? तर ही बातमी वाचा! अहवालात धक्कादायक माहिती आली पुढे

nestle cerelac: लहान मुलांना पौष्टिक अन्न म्हणून जर तुम्ही नेस्ले सेरेलॅक आणि दुधाची पावडर देत असाल तर सावधान. या बाबतचा एक धक्कादायक अहवाल पुढे आला आहे. या अहवालात नेस्ले भारत आणि इतर आशियाई आणि आफ्रिकन देशांतील मुलांना दिल्या जाणाऱ्या दूध आणि सेरेलॅकमध्ये भेसळ करत असल्याचे आढळून आले आहे. तर युरोप आणि ब्रिटनच्या बाजारपेठेत मात्र, शुद्ध आणि भेसळविरहित सेरेलॅकची विक्री केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

lion sita akbar case : बंगालच्या प्राणी संग्रहालयातील सिंहाना मिळणार नवी ओळख! सीता, अकबर ऐवजी 'ही' नावे ठेवली जाणार

नेस्लेच्या या कृत्यावर जागतिक आरोग्य संघटना संतापली आहे. त्यांनी सांगितले की अशी उत्पादने सुरुवातीपासून सहा महिने आणि दोन वर्षांपर्यंत मुलांना दिली जातात. नेस्लेच्या उत्पादनांमध्ये असलेली ही भेसळ लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. या भेसळयुक्त सेरेलॅकमुळे आरोग्यावर मोठा परिमाण होऊ शकतो.

पब्लिक आय आणि आयबीएफएएन (इंटरनॅशनल बेबी फूड ॲक्शन नेटवर्क) या स्विस तपास संस्थेने नेस्ले उत्पादनांमध्ये होत असलेली भेसळ उघड केली आहे. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या दुधात नेस्ले अतिरिक्त साखरेचा वापर करत असल्याचे अहवालात उघड झाले आहे. ही भेसळ फक्त आशियाई आणि गरीब आफ्रिकन आणि लॅटिन देशांमध्ये केली जात असल्याचे देखील तपासात पुढे आली आहे. खरेतर, नेस्ले युरोप आणि यूकेमधील त्याच्या मुख्य बाजारपेठांमध्ये ही भेसळ करत नसल्याचे देखील अहवालात म्हटले आहे. तपास पथकाने नेस्लेची दूध पावडर आणि सेरेलॅक हे भारत आणि इतर आशियाई देश, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत विकल्या गेलेल्या बेल्जियमच्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले तेव्हा ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.

Maharashtra Weather update: राज्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट! 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

नेस्लेचा भारतात मोठा व्यवसाय आहे. २०२२ मध्ये त्यांची भारतातील उलाढाल ही २५० अमेरिकल डॉलर्स एवढी होती. अशा परिस्थितीत नेस्लेबाबतचा हा अहवाल धक्कादायक मानला जात आहे. अहवालात असे दिसून आले आहे की नेस्लेच्या सर्व सेरेलॅक बेबी उत्पादनांमध्ये सरासरी ३ ग्रॅम अतिरिक्त साखर असते.

कुठे भेसळ आणि कुठे शुद्धविक्री मुळे नेस्लेवर जागतिक आरोग्य संघटना भडकली

नेस्लेने जर्मनी, फ्रान्स आणि यूकेमध्ये विकल्या गेलेल्या सहा महिन्यांच्या बाळांसाठी सेरेलॅकमध्ये भेसळ केली नाही, मात्र, इतर देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या त्यांच्या उत्पादनात अतिरिक्त साखरेची भेसळ करण्यात आली आहे. ६ ग्रॅमपेक्षा जास्त साखर वापरणे हे लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे, नेस्लेच्या अशा दुटप्पी वागणुकीमुळे नेस्लेवर जागतिक आरोग्य संघटना भडकली आहे.

Dubai Rains 2024: मुसळधार पावसात पर्यटन नगरी दुबई बुडाली! पाहा भयानक फोटो

या धक्कादायक अहवालावर, डब्ल्यूएचओचे शास्त्रज्ञ, निगेल रोलिन्स म्हणतात की "ही दुटप्पी भूमिका आहे, ज्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही." ते म्हणाले की सत्य हे आहे की नेस्ले स्वित्झर्लंडमध्ये या उत्पादनांमध्ये ही अतिरिक्त साखर वापरत नाही, तर काही देशांमध्ये ते असे का करत आहेत असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे.

डब्ल्यूएचओने या प्रकरणी नेस्लेला चेतावणी दिली की आयुष्याच्या सुरुवातीला कोणत्याही बाळाला साखर दिल्यास लठ्ठपणा आणि इतर आजारांचा धोका वाढू शकतो. WHO ची चिंता रास्त आहे कारण २०२२ मध्ये WHO ने अर्भकांसाठी विक्रीयोग्य अन्न उत्पादनांमध्ये अतिरिक्त साखर आणि गोड पदार्थांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

या संदर्भात कंपनीने त्यांची बाजू मांडली आहे. “ आमची उत्पादने लहान मुलांच्या तृणधान्ये, प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे, खनिजे, लोह इत्यादि पौष्टिक गरजा बाल वयात लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तयार केली जातात. आम्ही आमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करत नाहीत. भारतात तयार करण्यात आलेली उत्पादने ही परिपूर्ण आहेत. तसेच सर्व सरकारनी नियमांनुसार घालून दिलेल्या सर्व नियमांचे आम्ही पालन करतो. जागतिक आरोग्य संघटनेद्वारे साखर आणि पोषक घटकांच्या आवश्यकतांशी संबंधित नियमांचे देखील आम्ही पालन करतो. वाढलेल्या साखरेचे प्रमाण कमी करणे हे नेस्ले इंडियाचे प्राधान्य आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये, आम्ही वाढीव साखरेचे प्रमाण ३० टाक्यांपर्यंत कमी केले आहे. आम्ही नियमितपणे आमच्या उत्पादनांचे पुनरावलोकन करतो. तसेच पोषण, गुणवत्ता, सुरक्षितता आणि चव यांच्याशी तडजोड न करता, जोडलेल्या साखरेची पातळी आणखी कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

IPL_Entry_Point

विभाग