दुबई मेट्रोपोलिसचा रस्ता मुसळधार पावसामुळे बुडाला. बुधवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यांना मोठ्या प्रमाणात पुर आलेला. पुराचे पाणी रस्त्यावरून ओसंडून वाहत होते. या पावसामुळे गाड्या वाहून गेल्या. तर अनेक घरात पाणी घुसले.
मुसळधार पावसामुळे दुबईत हजारो वाहने पाण्यात बुडाली आहेत. रस्त्यावर पाणी वाहत असल्याने लोकांना ताटकळत राहावे लागत आहे. रस्त्यावरून पाणी वाहते असल्याने या पाण्यातून अनेकांची वाहने देखील वाहून गेली आहे.
मुसळधार पावसामुळे दुबईच्या विमानसेवेवर देखील परिमाण झाला आहे. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेट. यामुळे अनेक नगरीकण विमानतळावर अडकून पडले आहेत.
मुसळधार पावसामुळे पाण्यात अडकलेल्या महागड्या कारला बाहेर काढण्यासाठी तिथले लोक आटोकाट प्रयत्न करत असतांना टिपलेले हे छायाचित्र.
दुबईमध्ये पावसात अडकलेल्या नागरिकांना खाद्यवस्तु पूर्वतांना नागरिक. पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून अनेक वस्तुंचा तुडवडा निर्माण झाला आहे. अनेक मॉलमध्ये पाणी घुसल्याने ती बंद करण्यात आली आहेत.
दुबईत दोन दिवस झालेला असा मुसळधार पाऊस हा पहिल्यांदाच आला आहे. पावसाचे पाणी मॉल्स, अपार्टमेंटच्या काही मजल्यांमध्ये घुसले आहे. तर वादळी वाऱ्यामुळे अनेक गोष्टी उडून गेल्या.
दुबईमध्ये दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. सोमवारी आणि मंगळवारी आणि बुधवारी सकाळपासून हा पाऊस सुरू असून या मुळे मोठा पुर आला आहे. पावसामुळे दुबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे एकाचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.