मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ऑपरेशनच्या नावाखाली डॉक्टरने किडन्या चोरल्या; महिलेची प्रकृती चिंताजनक, प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

ऑपरेशनच्या नावाखाली डॉक्टरने किडन्या चोरल्या; महिलेची प्रकृती चिंताजनक, प्रशासनाकडून चौकशीचे आदेश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 06, 2023 06:02 PM IST

Muzaffarnagar Crime News : जंतुसंसर्गाच्या आजारावर उपचार करण्यासाठी महिला रुग्णालयात गेली होती. त्यावेळी डॉक्टरनं ऑपरेशन करत तिच्या किडन्या काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Muzaffarnagar Bihar Crime News Marathi
Muzaffarnagar Bihar Crime News Marathi (HT_PRINT)

Muzaffarnagar Bihar Crime News Marathi : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरांमध्ये किडनीचोरीच्या घटना समोर आलेल्या आहेत. शस्त्रक्रियेच्या नावाखाली अनेक लोकांच्या किडन्या चोरल्याची घटना घडलेल्या असतानाच आता बिहारमधील मुजफ्फरनगरमध्येही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. जंतुसंसर्गाच्या आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेवर बनावट डॉक्टरने ऑपरेशन करत दोन्ही किडन्या काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्यानंतर आता पीडित महिला आजारी पडली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनानं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या सुनिता देवी यांना गेल्या काही दिवसांपासून जंतुसंसर्गाचा त्रास होत होता. त्यामुळं त्यांनी शहरातील शुभकांत नावाच्या रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. त्यावेळी तेथील डॉ. पवन कुमार यांनी ऑपरेशन करण्याची गरज असल्याचं सुनिता यांना सांगितलं. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितल्यानंतर सुनिता यांनी होकार दिला. त्यानंतर ऑपरेशनचा बहाणा करत आरोपी बनावट डॉ. पवन कुमार याने त्यांच्या दोन्ही किडन्या काढून घेतल्या. सुनिता यांच्या शरीरात एकही किडनी नसल्यामुळं त्या आजारी पडल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून ही घटना समोर आल्यानंतर आता मुजफ्फरपूरमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

महिलेच्या किडन्या चोरल्याची घटना समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनानं आरोपी डॉ. पवन कुमार यांच्यासह संबंधित रुग्णालयाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय मानवाधिकार आयोगानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली घेत जिल्हा प्रशासन आणि रुग्णालयाला नोटिस जारी केली आहे. पीडित महिला सुनिता देवी यांच्यावर सध्या मुजफ्फरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

IPL_Entry_Point