मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Air Vistara : विमान कंपन्यांच्या चुकीला माफी नाहीच; एअर विस्ताराला डीजीसीएकडून तब्बल ७० लाखांचा दंड

Air Vistara : विमान कंपन्यांच्या चुकीला माफी नाहीच; एअर विस्ताराला डीजीसीएकडून तब्बल ७० लाखांचा दंड

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 06, 2023 04:25 PM IST

Air Vistara Flights : विमानांची उड्डाण व्यवस्था करताना एक चूक करणं एअर विस्तारा या कंपनीला चांगलंच महागात पडलं आहे. त्यानंतर आता डीजीसीएनं कंपनीला लाखोंचा दंड ठोठावला आहे.

Air Vistara Flights In North Eastern States In India
Air Vistara Flights In North Eastern States In India (HT)

Air Vistara Flights In North Eastern States In India : गेल्या काही दिवसांपासून विमान कंपन्यांच्या चुकांवर आणि गैरप्रकारांची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून गंभीर दखल घेण्यात येत आहे. विमानांतील गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना समोर आल्यानंतर केंद्रानंही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता पूर्वोत्तर राज्यांमधील विमान उड्डाणं कमी केल्याच्या कारणावरून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने एअर विस्तारा या कंपनीला तब्बल ७० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०२२ मध्ये कंपनीनं विमानाच्या उड्डाणांमध्ये अनियमितता आढळून आल्यानंतर डीजीसीएनं कठोर पावलं उचलली आहे. त्यामुळं एअर विस्तारा कंपनीला मोठा धक्का बसला असून त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ या वर्षात एअर विस्तारा या कंपनीनं डीजीसीएच्या रूट डिस्पर्सल गाइडलाइन्सचं उल्लंघन करत भारतातील पूर्वोत्तर राज्यांमधील विमान उड्डाणांची संख्या कमी केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यामुळं गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्याचं लक्षात येताच डीजीसीएनं एअर विस्तारा कंपनीला तब्बल ७० लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यानंतर कंपनीनं तातडीनं सर्व दंड भरल्याचं डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पश्चिम बंगालमधील बागडोगरा विमानतळ बंद असल्याच्या कारणामुळं विमान पूर्वोत्तर राज्यांमध्ये विमानांची उड्डाणसंख्या कमी झाल्याचं कंपनीनं मान्य केलं आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयकडून एअरलाइन कंपन्यांना प्रत्येक सेक्टरमधील किमान फ्लाइट्सची माहिती दिली जाते. एअर विस्ताराने डीजीसीएच्या या नियमाकडे दुर्लक्ष केल्यामुळं कंपनीवर कारवाई केली गेली आहे. एअर विस्तारानं पूर्वोत्तर राज्यांमध्ये डीजीसीएनं निश्चित केलेल्या फ्लाईट्सपेक्षा कमी उड्डाणं कंपनीनं केली आहेत, त्यामुळं कंपनीवर कारवाई केली गेल्याचं डीजीसीएकडून सांगण्यात आलं आहे. केवळ एअर विस्ताराच नाही तर महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

IPL_Entry_Point

विभाग