मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Food In Railway : मेसेज करा अन् हॉटेलमधून मिळवा आवडीचं जेवण; रेल्वेनं जारी केला व्हॉट्सअ‍ॅप नंबर

Food In Railway : मेसेज करा अन् हॉटेलमधून मिळवा आवडीचं जेवण; रेल्वेनं जारी केला व्हॉट्सअ‍ॅप नंबर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 06, 2023 03:56 PM IST

Food In Train News : प्रवासादरम्यान प्रवाशांना केवळ एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे हॉटेलमधील जेवण उपलब्ध करून देण्याची सुविधा भारतीय रेल्वेनं जारी केली आहे.

Indian Railway Whatsapp Number For Food During Travel
Indian Railway Whatsapp Number For Food During Travel (HT)

Indian Railway Whatsapp Number For Food During Travel : रेल्वेतून प्रवास करत असतानाच अनेकदा प्रवासी मागवलेल्या जेवणाच्या गुणवत्तेवरून तक्रार करत असतात. त्यामुळं रेल्वेनं कँटिन व्यवस्थेत मोठा बदल करत प्रवाशांच्या सुविधेसाठी आणखी एक मोठं आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. कारण आता प्रवाशांना रेल्वेतील जेवण न आवडल्यास बाहेरच्या हॉटेलमधून जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. त्यामुळं आता रेल्वेच्या या निर्णयामुळं लाखो प्रवाशांना आपल्या आवडीचं जेवण बाहेरून मागवता येणार आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वेनं स्थानिक खाद्यपदार्थांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना लागू केली होती. त्यानंतर आता रेल्वेसह बाहेरील हॉटेलमधील जेवणही प्रवाशांना उपलब्ध करून देण्याची सोय रेल्वेकडून करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जर रेल्वेत तुम्ही मागवलेलं जेवण तुम्हाला आवडलं नसेल तर रेल्वेनं जारी केलेल्या ९१-८७५०००१३२३ या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर एक मेसेज केल्यास तुम्हाला बाहेरील हॉटेलमधील जेवण रेल्वेत उपलब्ध होणार आहे. रेल्वेच्या पीएसयू आईआरसीटीसी या विभागानं ही सुविधा प्रवाशांसाठी जारी केली आहे. आतापर्यंत प्रवाशांना रेल्वेतील कॅन्टीनमधीलच जेवण मागवता येत होतं. कॅन्टीनशिवाय प्रवाशांना दुसरा कोणताही पर्याय रेल्वेनं दिलेला नव्हता. परंतु आता रेल्वेनं कॅन्टीनशिवाय बाहेरच्या हॉटेलमधील जेवणही प्रवाशांना उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

रेल्वे प्रशासानं व्हॉट्सअ‍ॅप नंबर जारी केल्यानंतर प्रवाशांसाठी चॅटबोटचीही सुविधा दिली आहे. त्याचा वापर करत प्रवाशांना जेवणाची आर्डर देता येणार आहे. यासिवाय हॉटेलमधून मागवलेल्या जेवणावरील प्रतिक्रियाही रेल्वे प्रशासन प्रवाशांकडून घेणार आहे. रेल्वेनं पहिल्या टप्प्यात प्रवाशांना ५० हजार डिशेस उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point