मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Hingoli Crime News : वाढदिवशी तरुणानं तलवारीने कापले ११ केक, धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Hingoli Crime News : वाढदिवशी तरुणानं तलवारीने कापले ११ केक, धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 29, 2023 12:41 PM IST

Hingoli Crime News Marathi : वाढदिवसाच्या दिवशी तरुणाने चक्क धारदार तलवारीने केक कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Hingoli Crime News Marathi
Hingoli Crime News Marathi (HT)

Hingoli Crime News Marathi : वाढदिवशी अनेक तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी गोळा करत धारदार शस्त्राने केक कापण्याचा जणू ट्रेंडच होत चालला आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये आरोपींच्या वाढदिवशी राडा झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आलेल्या आहे. त्यातच आता हिंगोलीत एका तरुणाने वाढदिवशी चक्क तलवारीने ११ केक कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हिंगोलीतील रोहा गावात कमलेश बांडेबुचे या तरुणाने तलवारीने केक कापला आहे. त्यानंतर आता आरोपी तरुणावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या मोहाडी तालुक्यातील रोहा गावात कमलेश बांडेबुचे या तरुणाचा वाढदिवस असल्यामुळं त्याच्या मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. याशिवाय अनेकांनी सोबत केकही आणले होते. त्यानंतर कमलेशने ११ केक रांगेत ठेवून तलवारीने कापले, त्यानंतर त्याचा व्हिडिओही शूट करण्यात आला. कमलेश आणि त्याच्या मित्रांनी केक कापताना चांगलीच अतिषबाजी करत घोषणाबाजी केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु आता कमलेश याला तलवारीने केक कापणं चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे, कारण त्याच्यावर पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच हिंगोली शहरात एका तरुणाने वाढदिवशी धारदार शस्त्राने केक कापत जोरदार सेलिब्रेशन केलं होतं. त्यानंतर पोलिसांकडून आरोपीवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता रोहा गावात तरुणाने आपल्या वाढदिवशी धारदार तलवारीने केक कापल्याची घटना समोर आल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळं या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. व्हायरल व्हिडिओत आरोपी कशा पद्धतीने केक कापत आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळं आता या प्रकरणाबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point