मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jejuri: जेजुरी विश्वस्त पदाचा वाद चिघळला; आज आंदोलनाचा चौथा दिवस, ग्रामस्थ घेणार अजित पवारांची भेट

Jejuri: जेजुरी विश्वस्त पदाचा वाद चिघळला; आज आंदोलनाचा चौथा दिवस, ग्रामस्थ घेणार अजित पवारांची भेट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 29, 2023 11:22 AM IST

Jejuri news : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त पदाचा वाद चांगलाच चिघळला आहे. ग्रामस्थांच्या धरणे आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून उद्या जेजुरी ग्रामस्थ अजित पवारांची भेट घेणार आहेत.

Jejuri news
Jejuri news

पुणे : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त पदाचा वाद चिघळला आहे. खंडेरायाच्या जेजुरीत, खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन, जत्रा-यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्‍वस्तांच्या निवडी झाल्या. मात्र, या निवडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून जेजुरी बाहेरील ६ जणांच्या निवडी राजकीय हस्तेक्षेपामुळे करण्यात आली. यामुळे ग्रामस्थ गेल्या तीन दिवसांपासून आंदोलंन करत आहेत. उद्या ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Road Accident : गुवाहाटी येथे भीषण अपघात ७ इंजिनियर विद्यार्थी जागीच ठार; ६ जण जखमी

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत, खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन, जत्रा-यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्‍वस्तांच्या निवडी झाल्या. मात्र, या निवडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून जेजुरी बाहेरील ६ जणांच्या निवडी राजकीय हस्तेक्षेपामुळे करण्यात आली. परिणामी जेजुरीत याबाबत नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान, हे नवे विश्वस्त गुरुवारी रात्री पदभार घेण्यासाठी आले होते. मात्र, संतप्त स्थानिकांनी या विश्वस्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, या विश्वस्त निवडीच्या विरोधात ग्रामस्थ तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत, जेजुरी शहर भाजप अध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Manipur violence : अमित शहा यांच्या दौऱ्याआधी मणीपुरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; पाच ठार, संचारबंदी कठोर

जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा सुरू असलेला वाद हा गंभीर प्रश्न आहे. पालकमंत्री आणि प्रशासनाने मार्ग काढला पाहिजे, त्यांची ती जबाबदारी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, जेजुरीतील ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन जागरण गोंधळ, रास्ता रोको केला. धर्मदाय आयुक्त यांच्या निर्णयाच्या विरोधात जेजुरीकर कोर्टात जाणार असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

 

जेजूरी देवस्थानात सात विश्‍वस्तांपैकी ५ ते ६ विश्वस्त हे एकाच राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. तसेच ते बाहेरील रहिवासी आहेत, असा आरोपी ग्रामस्थांचा आहे. निवडीमध्ये एकच विश्‍वस्त स्थानिक निवडला आहे. जेजुरीतील सेवेकरी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना राजकीय हस्तक्षेपाने डावलले गेले आहे. ही बाब ग्रामस्थांसाठी अत्यंत दुर्दैवी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणं आहे.

IPL_Entry_Point

विभाग