मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Manipur violence : अमित शहा यांच्या दौऱ्याआधी मणीपुरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; पाच ठार, संचारबंदी कठोर

Manipur violence : अमित शहा यांच्या दौऱ्याआधी मणीपुरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; पाच ठार, संचारबंदी कठोर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 29, 2023 10:29 AM IST

Manipur violence : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. यात एका पोलिसासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Smoke billows from a fire that broke out amid clashes between armed groups and security forces in Manipur on Sunday. (PTI)
Smoke billows from a fire that broke out amid clashes between armed groups and security forces in Manipur on Sunday. (PTI) (HT_PRINT)

गुवाहाटी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. यात एका पोलिसासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय १२ जण जखमी झाले आहेत. गृहमंत्री अमित शहा हे आज मणीपुर दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, आतापर्यंत ४० दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे.

बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्कोंवर विष प्रयोग ? पुतिन यांची भेट घेतल्यावर थेट रुग्णालयात दाखल

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी गृहमंत्री अमित शहा आज राज्याचा दौरा करणार आहेत. यादरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशिवाय ते इतर मंत्री आणि महत्त्वाच्या संस्थांच्या लोकांची भेट घेणार आहेत. या दरम्यान हिंसाचार आणि सलोख्याचा निर्माण करण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा केली जाणार आहे. येथील तणाव निवरण्यासाठी काय करता येईल यासाठी हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. दरम्यान, शहा यांच्या दौऱ्यापूर्वी पुन्हा एकदा हिंसाचार हा तीव्र झाला आहे.

Weather Update : राज्यात पुढील ४८ तासांत 'या' भागात मुसळधार पूर्वमोसमी पाऊस बरसणार; मुंबई, पुण्याची स्थिती काय ?

रविवारीच पुन्हा एकदा उसळलेल्या हिंसाचारात एका पोलिसासह ५ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय १२ जण जखमी झाले आहेत. एवढेच नाही तर गेल्या ४ दिवसांत लष्कर आणि पोलिसांच्या कारवाईत ४० अतिरेकी मारले गेले आहेत. सीएम वीरेन सिंह यांनी रविवारीच सांगितले की, मणिपूरमध्ये ४० सशस्त्र कुकी अतिरेकी मारले गेले आहेत. मणिपूरमध्ये ३ मेपासून हिंसाचार सुरूच आहे. राज्याची राजधानी इंफाळच्या आसपास स्थायिक झालेला मीताई समुदाय आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या कुकी समुदाय यांच्यात हिंसाचार सुरू आहे. मणिपूर उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे हा हिंसाचार घडला आहे, ज्यामध्ये त्यांनी सरकारला मीतेई समुदायाला एसटीचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याचा सल्ला दिला होता. या प्रस्तावामुळे कुकी समाज संतप्त झाला आणि त्यांनी त्याविरोधात मोर्चा काढला. त्या रॅलीदरम्यान हिंसाचार झाला आणि तेव्हापासून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत ७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. एका सहकारी अधिकाऱ्याने सांगितले की, कुकी अतिरेकी सशस्त्र आहेत आणि ते हिंसाचार वाढवत आहेत. परिस्थिती एवढी बिकट आहे की, राज्यातील आमदार आणि मंत्र्यांचीही सुटका होत नसून त्यांच्या घरांवर हल्ले होत आहेत.

 

कठोर कर्फ्यूमध्ये व्यवसाय ठप्प

राज्यातील अनेक भागात ३ मेपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यापूर्वीही कर्फ्यूमध्ये काही प्रमाणात दिलासा देण्यात आला होता, मात्र हिंसाचार पुन्हा वाढल्यानंतर पुन्हा कर्फ्यू कठोर करण्यात आला आहे. इंफाळ पश्चिम आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू शिथिल करण्यात आल्याने लोकांना पहाटे ५ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता ही वेळ कमी करण्यात आली आहे. लोकांना सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय बिष्णुपूरमध्येही कर्फ्यूमध्ये शिथिलता पहाटे ५ ते पहाटे २ ऐवजी १२ वाजेपर्यंत असेल.

IPL_Entry_Point

विभाग