मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Update : राज्यात पुढील ४८ तासांत 'या' भागात मुसळधार पूर्वमोसमी पाऊस बरसणार; मुंबई, पुण्याची स्थिती काय ?

Weather Update : राज्यात पुढील ४८ तासांत 'या' भागात मुसळधार पूर्वमोसमी पाऊस बरसणार; मुंबई, पुण्याची स्थिती काय ?

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 29, 2023 08:54 AM IST

State Weather Update : हवामान विभागाने राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस बरसणार असून वाढत्या उष्णतामनापासून या मुळे दिलासा मिळणार आहे.

State weather update
State weather update (PTI)

पुणे : राज्यासाठी पुढील ४८ तास महत्वाचे आहे. या काळात अनेक भागात अवकाळी पाऊस बरसणार असून तापमानात देखील घट होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस बरसणार आहे.

राज्यात येत्या जून महिन्यात ९ तारखेला मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. परिणामी राज्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या दोन दिवसांत अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग मॉन्सून व्यापणार असून राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रिय स्थिती तयार झाली आहे. तर दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत.

Rail Neer : मुंबईमुळे पुणे रेल्वे स्थानकावर पाण्याचा तुटवडा; मोठी मागणी असूनही रेल नीरचा पुरवठा होईना

या कारणामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. बहुतांश शहराचे तापमान चाळीस अंशांपर्यंत आले आहे. राज्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद याठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

 

दरम्यान यंदा जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या काळात भारतात दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के पर्जन्यमान अपेक्षित आहे. त्यात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत चार टक्के कमी किंवा जास्त होऊ शकतात, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

IPL_Entry_Point

विभाग