मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rail Neer : मुंबईमुळे पुणे रेल्वे स्थानकावर पाण्याचा तुटवडा; मोठी मागणी असूनही रेल नीरचा पुरवठा होईना
Pune Railway Station News Updates
Pune Railway Station News Updates (HT)

Rail Neer : मुंबईमुळे पुणे रेल्वे स्थानकावर पाण्याचा तुटवडा; मोठी मागणी असूनही रेल नीरचा पुरवठा होईना

26 May 2023, 13:00 ISTNinad Vijayrao Deshmukh

Rail Neer : आयआरटीचे उत्पादन असलेल्या रेल नीरचा मागणी प्रमाणे पुरवठा होत नसल्याने पुणे रेल्वे स्थानकावर याचा तुडवडा निर्माण झाला आहे.

पुणे : सध्या उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी देखील वाढली आहे. रेल्वे स्थानकावर देखील पाण्याची मोठी मागणी वाढली आहे. स्थानकावर प्रामुख्याने आयआरटीसीचे उत्पादन असलेले रेल नीर पुरवल्या जाते. या पाण्याची मोठी मागणी असतांना प्रधान्यांने मुंबई स्थानकावर याचा पुरवठा होत असल्याने या पाण्याचा तुडवडा पुणे रेल्वे स्थानकावर होत आहे. परिणामी दुसऱ्या ब्रॅंडच्या पाण्याच्या बाटलांची विक्री या स्थानकावर करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

New Parliament Inauguration : दोन हजारच्या नोटबंदीनंतर आता येणार ७५ रुपयांचं नाणं, संसदेच्या उद्घाटन सोहळ्याचा मुहूर्त

मुंबई पाठोपाठ पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावरून सुटतात. या स्थानकावर आयआरसीटीसीद्वारे रेलनीर या बाटलीबंद पाण्याचा पुरवठा केला जातो. याचा प्रकल्प अंबरनाथला असून या ठिकाणी उत्पादित केलेले बाटलीबंद पाणी हे मुंबई विभाग, पुणे विभाग आणि सोलापूर विभागांना पुरवले जाते. इतर हंगामात हा पुरवठा सुरळीत असतो मात्र, उन्हाळा आला की मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या प्रकल्पातून होणारा पुरवठा अपुरा होतो. अपुऱ्या पूर्वथयामुळे प्रवाशांचे हाल होतात. यासाठी मध्य रेल्वेने इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्यांची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. यात ऑक्सिमोअर ॲक्वा, रोकोक्को, हेल्थ प्लस, गॅलन्स, निम्बूज, ऑक्सी ब्ल्यू, सन रिच, एल्विश, इयोनिटा यांचा समावेश आहे. दरम्यान, अंबरनाथ प्रमाणे पुण्यात रेलनीरचा प्रकल्प उभारण्याच्या विचारात रेल्वे प्रशासन विचारात आहे.

HSC Exam Scam : बारावीच्या उत्तरपत्रिकेत एकाच हस्ताक्षरात लिहिणाऱ्या दोन प्राध्यापकांवर गुन्हा

पुणे स्थानकावर रोज तबल १ हजार पाण्याचे बॉक्स मागविले जातात, एका बॉक्समध्ये १२ बाटल्या अशा १२ हजार बॉटल्स रोज पुणे स्थानकावर विकल्या जातात. मात्र सध्या रेल नीर कडून अर्ध्याच पुरवठा केला जात आहे.

 

या बाबत पुणे स्थानकाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे म्हणाले, सध्या उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. उन्हाळा आला की वाढलेल्या मागणीमुळे स्थानकावर रेलनीरचा तुटवडा होतो. यामुळे आम्ही इतर कंपन्यांचा पाण्याच्या बाटल्यांचा विक्रीला परवानगी दिली आहे.

विभाग