मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  HSC Exam Scam : बारावीच्या उत्तरपत्रिकेत एकाच हस्ताक्षरात लिहिणाऱ्या दोन प्राध्यापकांवर गुन्हा

HSC Exam Scam : बारावीच्या उत्तरपत्रिकेत एकाच हस्ताक्षरात लिहिणाऱ्या दोन प्राध्यापकांवर गुन्हा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 26, 2023 12:11 PM IST

HSC Exam Scam : बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. मात्र, छत्रपती संभाजी नगर येथे तब्बल ३७२ विद्यार्थ्यांच्या परीक्षेत दोन हस्ताक्षर असल्याचे सिद्ध झाले होते. या प्रकरणी दोन प्राध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

HSC Board Exam 2023
HSC Board Exam 2023 (HT)

छत्रपती संभाजी नगर: बारावी परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे. मात्र, फिजिक्सच्या पेपर तपासतांना तब्बल ३७२ पेपरमध्ये दोन हस्ताक्षरे असल्याने खळबळ उडाली होती. बोर्डाने यांची गंभीर दाखल घेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासात दोन प्राध्यापकांना अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lok Sabha election : लोकसभेसाठी भाजप-शिंदे गटाचा नवा फॉर्म्युला?; ‘इतक्या’ जागा लढवण्याचा प्रस्ताव

उसारे राहुल भगवानसिंग (रा पिंपळा ता. सोयगाव), मनीषा भागवत शिंदे (रा. धनवट ता.सोयगाव) असे आरोपी प्राध्यापकांची नावं आहेत. हे दोघे प्राध्यापक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालयात उध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणी सोयगाव पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी असलेले रंगनाथ रेवबा आढाव यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

New Parliament Inauguration : दोन हजारच्या नोटबंदीनंतर आता येणार ७५ रुपयांचं नाणं, संसदेच्या उद्घाटन सोहळ्याचा मुहूर्त

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बोर्डाने एक चौकशी समिती नेमली होती. दरम्यान यावेळी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील या उत्तरपत्रिका असल्याचे समोर आले. पण दुसरे हस्ताक्षर कोणाचे याचा शोध घेण्यासाठी विद्यार्थी, परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक, कस्टडियनची, मॉडरेटर आणि प्राचार्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशी अंती समितीने उसारे राहुल भगवानसिंग आणि मनीषा भागवत शिंदे या दोन्ही अध्यापकांना दोषी ठरविल्याचा अहवाल सादर केला. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राजकुंवर कनिष्ठ महाविद्यालयाचे उध्यापक राहुल उसारे आणि अध्यापिका मनिषा शिंदे यांच्याकडे १२ वीच्या फिजिक्सच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी देण्यात आल्या होत्या. त्यांनी 13 मार्चपर्यंत या उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे न करता त्या स्वत: कडे तब्बल २५ दिवस ठेवल्या. ८ एप्रिल रोजी त्यांनी त्या बोर्डाकडे परत पाठवल्या. या उत्तरपत्रिका तपासल्यानंतर यामध्ये दोन वेगेवेगळे अक्षर असल्याची महिती त्यांनी बोर्डाला दिली नव्हती. पण हीच बाब उत्तरपत्रिकांची पुर्नतपासणी करत असताना आढळल्याने या प्रकारचा उलगडा झाला.

WhatsApp channel