मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राजकारणात पुत्रप्रेमाला भरतं! तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकप फायनल हरला, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रत्युत्तर

राजकारणात पुत्रप्रेमाला भरतं! तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्डकप फायनल हरला, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना प्रत्युत्तर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 15, 2024 06:20 PM IST

Uddhav Thackeray on Amit Shah : भंडाऱ्यातील सभेत अमित शहांनी म्हटले होते की, उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना पक्ष फटला. यावर उद्धव ठाकरेंनी मिश्किल टोलेबाजी करत म्हटले की, अमित शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषक फायनल हरला.

अमित शाहंच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप फायनल हरला, उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
अमित शाहंच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप फायनल हरला, उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रात प्रचार करताना नरेंद्र मोदी (Narendra Modi) व अमित शहांकडून (Amit shah) उद्धव ठाकरेंना निशाणा बनवले जात आहे. भंडाऱ्यातील सभेत अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना पक्ष फुटल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेरास सव्वाशेर उत्तर दिले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

तुमच्या पुत्रप्रेमामुळे (amit shahs love for his son jay shah) टीम इंडिया विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना हारला, (india lost world cup final) असा जहरी टोला उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना लगावला आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी शहांना टोला लगावला.

काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी नांदेड आणि भंडाऱ्यातील सभेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. दे दोघे सातत्याने भाजपने आमचा पक्ष फोडला, असे म्हणत असतात. पण महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचे आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष भाजपने फोडले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली तर शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी पक्ष फुटला, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. 

यावर उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मुश्किल उत्तर दिले. मला अमित शहांना सांगायचे आहे की, तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला व विश्वचषक हातातून निसटला. मी इतकं पुत्रप्रेम दाखवलं नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष जय शहा हे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे पुत्र आहेत. गेल्यावर्षी भारतात एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतात गेल्यावर्षी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. याचा अंतिम सामना मुंबई किंवा कोलकाता येथील ऐतिहासिक मैदानांवर न खेळवता बीसीसीआयने वर्ल्डकपचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानावर आयोजित केला. या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर यावरून बीसीसीआयला टीकेचे धनी व्हावे लागले होते. 

उद्धव ठाकरेंनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अमित शहांचा चेला संबोधले. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पक्षात किती अधिकार असतात, हे सर्वांना माहिती आहे. अमित शहा जे बोलतात त्याच्यात आणि त्यांच्या चेलेचपाट्यांच्या वक्तव्यामध्ये एकवाक्यता ठेवली पाहिजे. तुम्ही सांगता की आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही फोडले नाहीत. मात्र फडणवीस म्हणतात की, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. अमित शहा यांची लाज त्यांचे चेलेचपाटे काढत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

IPL_Entry_Point