Kolhapur Crime News: कोल्हापूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून एका मुलाने आईची चाकूने भोसकून हत्या केली. मुलगा हा बायको सोबत फोनवर बोलत असतांना आईमध्ये बोलल्याच्या राग आल्याने मुलाचा राग अनावर झाला. या रागाच्या भरात मुलाने आईवर चाकूने हल्ला करत तिच्या मानेवर, गळ्यावर, हातावर चाकूने हल्ला केला. यात आई ही गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटन कोल्हापूरच्या साळोखे पार्क परिसरात मंगळवारी घडली.
सादिक मुजावर असं आरोपी मुलाचे नाव आहे तर शहनाज मुजावर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सादिकने आपल्या आईच्या पोटावर, छातीवर आणि पाठीवर चाकूने वार केले. या घटनेत शहनाज मुजावर या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
आरोपी शहनाज मुजावर याचे त्याचे कुटुंबीयांशी वाद होते. त्याच्या बहिणीशी देखील वाद झाले होते. या वादातून सादीक विरोधात कोल्हापूर पोलिस ठाण्यात आईने आई बहिणीने तक्रार देखील दिली होती. दरम्यान, सादीक ह्याची पत्नी माहेरी गेली होती. सादीक हा त्याच्या पत्नीसोबत फोनवार बोलत होता. यावेळी त्याची आई त्याच्याशी मध्येच बोलल्याने सादीकचा राग अनावर झाला. यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. माझ्या पत्नीशी मी बोलत असताना तू मघ्येच का बोलली?असे म्हणत त्याने रंगाच्या भरात आईवर चाकूने वार केले. सादिकने ईच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूने वार केले. हे वार वर्मी बसल्याने आईचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सादिक मुजावर विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. फक्त आई मध्ये बोललल्याने हत्या झाली की इतर काही कारणामुळे हत्या झाली? याचा तपास पोलीस करत आहे.