मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 01, 2024 12:00 PM IST

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं ११ कोटी गुंतवणूकदारांपैकी सुमारे सव्वा कोटींहून अधिक खाती ठप्प झाली आहेत.

KYC पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?
KYC पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

Investors kyc : केवायसी (Know Your Customer) पूर्ण न केल्यामुळं सेबीच्या कक्षेत येणाऱ्या सुमारे ११ कोटी गुंतवणूकदारांपैकी सव्वा कोटीहून अधिक खाती ठप्प झाली आहेत. केवायसी रजिस्ट्रेशन एजन्सीनं (KRA) ही कारवाई केली आहे. त्यामुळं संबंधित गुंतवणूकदारांना स्टॉक, म्युच्युअल फंड आणि कमोडिटीजमध्ये व्यवहार करू शकत नाहीत.

ट्रेंडिंग न्यूज

पाच केवायसी रजिस्ट्रेशन एजन्सींनी संयुक्तपणे एक तपशीलवार परिपत्रक जारी केलं आहे. अनेक गुंतवणूकदारांचे केवायसी अद्याप पॅन आणि आधारसह अपडेट केले गेले नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं विविध श्रेणींमध्ये केवायसीचं पुनर्वर्गीकरण करण्याची गरज निर्माण झाली. यापैकी बरेच केवायसी युटिलिटी बिले (वीज, टेलिफोन), बँक खात्याचे तपशील इ. सारख्या कागदपत्रांचा वापर करून केले गेले होते. सेबीच्या नियमानुसार ही कागदपत्रं केवायसीसाठी वैध दस्तऐवज म्हणून स्वीकारली जात नाहीत.

१ एप्रिलपासून केवायसी अपडेटिंग प्रभावीपणे करण्याच्या उद्देशानं केआरएनं प्रत्येक गुंतवणूकदाराच्या केवायसीचं तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केलं आहे. त्यात प्रमाणित, नोंदणीकृत आणि होल्ड अशा तीन श्रेणी आहेत. केआरएच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हे वर्गीकरण पॅन, आधार, ईमेल आणि गुंतवणूकदारांच्या मोबाइल नंबरच्या उपलब्धतेवर आधारित आहे. अंदाजे ११ कोटी गुंतवणूकदारांपैकी सुमारे ७.९ कोटी अर्थात ७३ टक्के गुंतवणूकदारांनी वैध केवायसी केलं आहे. सुमारे १.६ कोटी गुंतवणूकदार KYC नोंदणीकृत श्रेणीमध्ये आहेत.

…तर री-केवायसी करावी लागेल!

वैध केवायसी केलेल्या गुंतवणूकदारांना पुन्हा अद्ययावत करण्याची आवश्यकता नाही आणि ते त्यांची गुंतवणूक प्रक्रिया सुरू ठेवू शकतात. नोंदणीकृत केवायसी असलेले लोक देखील त्यांची गुंतवणूक चालू ठेवू शकतात, परंतु त्यांनी नवीन फंड हाऊसमध्ये गुंतवणूक केल्यास किंवा नवीन डीमॅट खाते उघडल्यास त्यांना reKYC प्रक्रियेतून जावं लागेल.

या गुंतवणूकदारांना पैसे काढता येणार नाहीत!

बँक तपशील, युटिलिटी बिलं आणि इतर तत्सम कागदपत्रं वापरून केलेलं KYC आता होल्डवर ठेवण्यात आलं आहे आणि अशा पद्धतीनं KYC केलेले गुंतवणूकदार यापुढं गुंतवणूक करू शकत नाहीत, त्यांना KYC कागदपत्रं अपडेट केल्याशिवाय पैसे काढण्याची परवानगी नाही.

WhatsApp channel

विभाग