Pune boy missing missing on merchant : पुण्यात वारजे येथे राहणारा तसेच मर्चंट नेव्ही मध्ये काम करणारा एक २२ वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध घेण्याचे विनंती त्याच्या पालकांनी केले आहे. हा तरुण शुक्रवारी ५ एप्रिल रात्रीपासून बेपत्ता असून त्याच्या पालकांना याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, त्याचे कुटुंबीय चिंतेत असून त्यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेत त्याचा शोध घेण्याचे विनंती परराष्ट्र मंत्रालय, जहाज बांधणी मंत्रालयाला केली आहे.
प्रणव गोपाळ कराड असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव असून तो गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट इंडिया या कंपनीत काम करत आहे. त्याचे वडील गोपाळ कराड यांनी यांनी काल पत्रकार परिषद घेत तो बेपत्ता झाल्याची माहिती माध्यमांना दिली. गोपाळ कराड हे चालक आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रणवने कोथरुड येथील एका संस्थेतून नॉटिकल सायन्स अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर तो अमेरिकेतील विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंटमध्ये नोकरी करत होता.
कंपनीच्या जहाजावर डेक कॅडेट म्हणून तो सहा महिन्यापूर्वी रूजू झाला होता. ५ एप्रिलला रात्री कंपनीतीलअधिकाऱ्यांनी प्रणवच्या वडिलांशी संपर्क करत प्रणव बेपत्ता झाल्याची माहिती दिली. प्रणव हा सिंगापूर आणि इंडोनेशिया दरम्यान जहाजातून बेपत्ता झाला असल्याचे इमेलद्वारे त्यांना सांगण्यात आले. त्याला शोधण्याबात काय सुरू आहे.
या बाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही माहिती दिली नाही. या बाबत त्यांनी कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना काही माहिती मिळाली नाही. त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्याच्या सहकाऱ्यांचा क्रमांक मागितला मात्र, तो देखील त्यांना देण्यास कंपनीने नकार दिला आहे.
या संदर्भात प्रणवचे वडील गोपाल म्हणाले, “हे जहाज इंडोनेशियाहून सिंगापूरला जात होते. शुक्रवारी संध्याकाळी, आम्हाला शिपिंग फर्मच्या मुंबई कार्यालयातून फोन आला की आमचा मुलगा जहाजात असताना बेपत्ता झाला आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की शोध मोहीम सुरू आहे आणि त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही मुंबई आणि पुणे पोलिसांशी संपर्क साधला आहे आणि त्यांची मदत घेतली आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालय, जहाज बांधणी मंत्रालयाशी संपर्क करुन प्रणवचा शोध घेण्याची मागणी आम्ही केली आहे.
संबंधित बातम्या