मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Karnataka News : साडेपाच कोटी रुपये रोख आणि १०६ किलो दागिने; निवडणुकीदरम्यान बेहिशेबी संपत्ती जप्त

Karnataka News : साडेपाच कोटी रुपये रोख आणि १०६ किलो दागिने; निवडणुकीदरम्यान बेहिशेबी संपत्ती जप्त

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 08, 2024 08:48 AM IST

Karnataka cops recover 5 crores cash and jewellery : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात पोलिसांनी केलेल्या छापेमारीत अमाप संपत्ती सापडली आहे. तब्बल ५.६० कोटी रुपये रोख आणि २ कोटी रुपये किमतीचे १०६ किलो दागिने जप्त केले.

 साडेपाच कोटी रुपये रोख आणि १०६ किलो दागिने; निवडणुकीदरम्यान बेहिशेबी संपत्ती जप्त
साडेपाच कोटी रुपये रोख आणि १०६ किलो दागिने; निवडणुकीदरम्यान बेहिशेबी संपत्ती जप्त

karnataka cops recover 5 crores cash and jewellery : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या धामधुमीत सर्वच पक्ष निवडणुकीचे मुद्दे घेऊन जनतेमध्ये जात आहेत. तर काही पक्ष शक्तीप्रदर्शन करत आहेत. त्याचबरोबर निवडणूक आयोग आणि पोलिसांचे पथक आचारसंहितेच्या अंतर्गत देशभरात लक्ष ठेवून आहेत. काल चेन्नई येथे ४ कोटी रुपयाची रोकड जप्त करण्यात आल्याची घटना ताजी असतांना कर्नाटकात पोलिसांनी केलेल्या छापेमारीत मोठे घबाड हाती लागले आहे. पोलिसांनी तब्बल ५ कोटी ६० लाख रुपये रोख आणि १०६ किलोचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले.

ट्रेंडिंग न्यूज

PM Modi In Jabalpur : पंतप्रधान मोदींच्या रॅलीतील स्टेज कोसळला! १० पेक्षा जास्त नागरिक जखमी

कर्नाटकात निवडणुकीच्या काळात एका मोठ्या छाप्यात पोलिसांनी एका ज्वेलरी दुकानाच्या मालकाच्या घरातून ५.६० कोटी रुपये रोख, ३ किलो सोने, १०३ किलो चांदीचे दागिने आणि ६८ चांदीचे बार जप्त केले. कर्नाटकातील बेल्लारी शहरात हा छापा टाकण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण ७.६० कोटी रुपये जप्त केले आहे तर दागिन्यांची किंमत २ कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे.

Nagpur News : नागपूरच्या मानकापुर चौकात भरधाव कंटेनरचा थरार! १२ हून अधिक वाहने चिरडली; १५ पेक्षा अधिक नागरिक जखमी

ज्वेलरी शॉपीचे मालक नरेश यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नरेश यांना अटक करण्यात अली आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना ब्रुसापेट पोलीस स्टेशन हद्दीतील ज्वेलर्सच्या घरी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने ठेवल्याची माहिती मिळाली.

Maharashtra Weather Update : राज्यात संमिश्र वातावरण! कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी वाऱ्यासह पाऊस; असे असेल हवामान

पोलिसांना या प्रकरणात हवाला लिंक असल्याचा संशय असून कर्नाटक पोलिसांनी कलम ९८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, आरोपींना पुढील चौकशीसाठी आयकर विभागाकडे सोपवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चेन्नई येथून चार कोटी जप्त

चेन्नई येथे देखील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथील तांबरम रेल्वे स्थानकावर ४ कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक भाजप कार्यकर्ता देखील आहे. पोलिसांनी सांगितले की, तीन लोक चार बॅगा भरून रोख रक्कम घेऊन जात होते. त्याच्याकडे ४ कोटी रुपयांची कॅश होती. तिघेही तिरुनेलवेलीला रेल्वेने जात होते. फ्लाइंग स्क्वॉडने अटक करून त्यांची झडती घेतली असता त्यांना रोकड सापडली.

WhatsApp channel