मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Firing : नाशिकमध्ये टोळक्याची दहशत! तलवारी नाचवत भर वस्तीत केली फायरिंग, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Nashik Firing : नाशिकमध्ये टोळक्याची दहशत! तलवारी नाचवत भर वस्तीत केली फायरिंग, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 08, 2024 09:51 AM IST

Nashik Firing : नाशिकमध्ये एका टोळक्याने भर वस्तीत मध्यरात्री गोळीबार केला. एवढेच नाही तर हवेत तलवारी फिरवून दहशत माजवली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

नाशिकमध्ये टोळक्याची दहशत! तलवारी नाचवत भरवस्तीत केली फायरिंग, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये टोळक्याची दहशत! तलवारी नाचवत भरवस्तीत केली फायरिंग, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Nashik Firing : नाशिकमध्ये गुंडांनी उच्छाद घातला आहे. रविवारी रात्री एका टोळक्याने हवेत तलवारी फिरवून काही जणांवर गोळीबार केल्याने खबळल उडाली आहे. टोळीयुद्धातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही घटना सिडकोमधील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवार घडली.

ट्रेंडिंग न्यूज

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. किरकोळ कारणावरून एकमेकांच्या जिवावर उठण्याच्या घटना वाढल्या आहेत. काल एका टोळक्याने भरवस्तीत गोळीबार केल्याने आणि तलवारी फिरवत परिसरात गोळीबार केल्याने शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न यांना सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहे. दोन सराईत गुन्हेगारांच्या वादानंतर हा प्रकार भर रस्त्यात घडला असून पोलिस तपास करत आहेत.

ISRO's Aditya L1 : इस्रोचे आदित्य एल १ सूर्यग्रहणाचा करणार अभ्यास; पाहा फोटो

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी दोन सराईत गुन्हेगारांच्या वाद झाला झाला होता. या वादातून रस्त्यावर हे टोळीयुद्ध भडकले. एका गटातील आरोपींनी भर रस्त्यात गाडीवरून येत तलावारी हवेत फिरवत दहशत माजवली. तर यातील काही गुंडांनी हवेत गोळीबार केला. या घटनेनंतर नागरिक सैरावैरा पळू लागले होते. ही संपूर्ण घटना सिसिटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे. टोळक्याने भरवस्तीत तलवारी नाचवत गोळीबार केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. नाशिकच्या सिडकोमध्ये असलेल्या त्रिमूर्ती चौकात या घटनेमुळे दहशतीचे वातावरण आहे.  या घटनेनंतर या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

चोख बंदोबस्त

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले असून नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग