Nagpur News : नागपूरच्या मानकापुर चौकात भरधाव कंटेनरचा थरार! १२ हून अधिक वाहने चिरडली; १५ पेक्षा अधिक नागरिक जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur News : नागपूरच्या मानकापुर चौकात भरधाव कंटेनरचा थरार! १२ हून अधिक वाहने चिरडली; १५ पेक्षा अधिक नागरिक जखमी

Nagpur News : नागपूरच्या मानकापुर चौकात भरधाव कंटेनरचा थरार! १२ हून अधिक वाहने चिरडली; १५ पेक्षा अधिक नागरिक जखमी

Apr 08, 2024 06:59 AM IST

speeding container hit vehicles in Nagpur : नागपूर येथे मध्यरात्री थरारक घटना घडली. मानकापूर (Mankapur area of Nagpur) चौकात एका भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

नागपूरच्या मानकापुर चौकात भरधाव कंटेनरचा थरार! १२ हून अधिक वाहने चिरडली; १५ पेक्षा अधिक नागरिक जखमी
नागपूरच्या मानकापुर चौकात भरधाव कंटेनरचा थरार! १२ हून अधिक वाहने चिरडली; १५ पेक्षा अधिक नागरिक जखमी

Nagpur Mankapur Accident : नागपूर येथे मध्यरात्री भीषण अपघात झाला. येथील मानकापूर चौकात एका भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने सिग्नलवर थांबलेल्या १२ पेक्षा अधिक वाहनांना धडक दिली. यात अनेक वाहनांचा चक्काचूर झाला. काही वाहने तर जोरदार धडकेमुळे एकमेकांच्या वर गेली होती. या भीषण अपघातात १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या चौकात अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवाने या जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार काल रात्री मानकापूर चौकात सिग्नल जवळ काही वाहने उभी होती. यावेळी येथील पूलावरून कंटेनर क्रमांक एमएच ३४ एबी ७८८१ या भरधाव वेगात येत होता. यावेळी या कंटेनरवरील चालकांचे नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना जोरदार धडक धडक दिली. अचानक झालेल्या या घटनेमुळे गोंधळ निर्माण झाला. कंटेनर भरधाव वेगात असल्याने त्याने अनेक वाहनांना धडक देत पुढे निघून जात होता. तब्बल १२ पेक्षा अधिक वाहनांना धडकुण हा ट्रक थांबला. या कंटेनरने आधी सिग्नलवर उभ्या असलेल्या कारला धडक दिली व त्यानंतर काही कार आणि दुचाकींना फरफटत नेले. या धडकेमुळे काही गाड्या या एकमेकांवर चढल्यातर एक दुचाकी कंटेनरखाली आल्याने तिचा चेंदामेंदा झाला. या अपघातात एक रुग्णवाहिका देखील चिरडली गेली.

अपघात झाल्यावर मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण झाले. नागरिक मोटमोठ्याने ओरडून मदत मागत होते. अपघातात १८ हून अधिक नागरिक जखमी झाले. मानकापूर चौकाजवळ असणाऱ्या दवाखान्यात जखमी नगरिकांना तातडीने हलवण्यात आले. घटनास्थळी पोलिस आणि नागरिकांनी धाव घेतली. चिरडलेल्या गेलेल्या वाहनातून अनेक जखमी नागरिकांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान हा अपघात कोणत्या कारणाने झाला याचा तपास सुरू होता.

Pune News : धक्कादायक! खंडणीसाठी मित्रांनीच महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून केली हत्या

अनेक जण जखमी तर वाहतुकीचा खोळंबा

या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. काही नागरीक गंभीर आहेत. सुदैवाने या घटनेत कुणाचा मृत्यू झाला नाही. या अपघातात रुग्णवाहिकेच्या चालकासह काही जणांचे हातपाय फॅक्चर झाले आहेत. या अपघातानंतर या मार्गवार मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

अनेकांना ओढून काढले बाहेर

या घटनेत गाड्यांचा चुराडा झाल्याने त्यात फसलेल्या नागरिकांना काढतांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे फसलेल्या नागरिकांना अक्षरक्ष: ओढून काढावे लागले. काही गाड्यांचे दरवाजे तोडण्यात आले. जखमी असलेल्यांना नागरिकांनीच दवाखान्यात दाखल केले.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर