मराठी बातम्या  /  निवडणुका  /  PM Narendra Modi : नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात, चंद्रपुरात फोडणार प्रचाराचा नारळ

PM Narendra Modi : नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात, चंद्रपुरात फोडणार प्रचाराचा नारळ

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 08, 2024 08:59 AM IST

PM Narendra Modi Chandrapur Sabha Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपूर येथे सभा आहे. मोदी हे चंद्रपूर येथून प्रचाराचा नारळ फोडणार असून राज्यातील सभांना सुरुवात होणार आहे.

नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात. चंद्रपुरात फोडणार प्रचाराचा नारळ
नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात. चंद्रपुरात फोडणार प्रचाराचा नारळ

PM Narendra Modi Chandrpur Sabha Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपूर येथे सभा आहे. मोदी यांची ही राज्यातील पहिली सभा आहे. या सभेतून सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचार पीएम नरेंद्र मोदी करणार आहे. तसेच राज्यातील प्रचाराचा नारळ देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी फोडणार आहे. मोदी यांची राज्याची ही पहिली प्रचार सभा असल्याने आपला विजय निश्चित होणार असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

PM Modi In Jabalpur : पंतप्रधान मोदींच्या रॅलीतील स्टेज कोसळला! १० पेक्षा जास्त नागरिक जखमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विरोधकांवर हल्ला चढवणार आहेत. ते आज सभेत काय बोलतील या कडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान, या सभेची जय्यत तयारी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. आज या ठिकाणी मोठी गर्दी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ चा प्रचार शिगेला पोहोचला आहे. एक दिवस आधी बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणावर प्रचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी आज चंद्रपूर जिल्ह्यात सभेला संबोधित करणार आहेत. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भात येणाऱ्या या भागात मतदान होणार आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. लोकसभेच्या जागांच्या संख्येच्या बाबतीत, देशातील सर्वात मोठे राज्य - उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे सर्वात महत्वाचे राज्य मानले जाते. येथे पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

Nagpur News : नागपूरच्या मानकापुर चौकात भरधाव कंटेनरचा थरार! १२ हून अधिक वाहने चिरडली; १५ पेक्षा अधिक नागरिक जखमी

भारतीय जनता पक्षाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्रातून निवडून आलेले केंद्रीय वन, संस्कृती आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. पीएम मोदी निवडणूक प्रचारादरम्यान भाजपला मत देण्याचे आवाहन मतदार राजाला करणार आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षा सोबत युती करून निवडणूक लढवत असलेल्या भाजपने राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी बहुमत मिळवण्याचा दावा केला आहे. आज होणाऱ्या सभेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत.

सभेसाठी चोख बंदोबस्त

चंद्रपूर येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या साठी या ठिकाणी आज चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीसांसोबतच राज्य रखीरव पोलिस दल, सीआरपीएफ तसेच पंतप्रधान यांच्या एसपीजी सुरक्षा व्यवस्था असा चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे.

WhatsApp channel