मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Kul : भाजपचे आमदार राहुल कुल अडचणीत; साखर कारखान्यात ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप

Rahul Kul : भाजपचे आमदार राहुल कुल अडचणीत; साखर कारखान्यात ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप

Mar 13, 2023 11:50 AM IST

Sanjay Raut letter to Devendra Fadnavis on Rahul Kul money laundering : मंत्रीमंडळाला चोर मंडळ म्हटल्याने संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अध्यक्षपदी राहुल कुल यांची निवड करण्यात आली. दरम्यान, संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

Uproar in Maharashtra assembly over MP Sanjay Raut's 'thief' remark
Uproar in Maharashtra assembly over MP Sanjay Raut's 'thief' remark

मुंबई : राज्यात ईडीच्या कारवाईवरुन सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना नाकीनऊ आणले आहे. यावरून राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. त्यात खासदार संजय राऊत यांनी मंत्रीमंडळाला चोर मंडळ म्हटल्यामुळे त्याच्यावर हक्कभंग आणण्यासाठी चौकशी समिती नेमली. या समितीच्या अध्यक्षस्थानी असलेले भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस करखान्यात केलेल्या गैरव्यवहारावरुन संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून कुल यांनी कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोपकेल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ईडीच्या कारवाईवरुन महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये कलगितुरा सुरू आहे.यावरून आता महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित गंभीर आरोप केले आहे. या पत्रात संजय राऊत हक्कभंग चौकशी समितीचे प्रमुख राहुल कुल यांना लक्ष केले आहे. राहुल कुल यांनी दौंडमधील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात तब्बल ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. कुल यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केले आहे.

संजय राऊत यांनी पत्रात लिहिले आहे की, आपल्या नेतृत्वाखालील सरकारने सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याचे ठरवले आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन. भारतीय जनता पक्षाचे काही नेते आपल्या अंतस्थ गोटात वावरत असतात, ते सातत्याने प्रमुख विरोधी पक्षांचे व्यवहार, त्यांच्या साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आणत आहेत. या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिराही लावला आतो. भ्रष्टाचाराचा धर्म व राजकीय पक्ष नसतो. या मताचा मी आहे.

पुणे जिल्ह्यातील दौड तालुक्यातील ‘भीमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षांत केलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे प्रकरण म्हणजे सरळ सरळ अंदाजे ५०० कोटी रापयांचे “मनी लॉडरिंगचे आहे. कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या सारख कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे आणि तपास यंत्रणांचे छापे पडत आहेत. पण दौंडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटीच गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे, असेही राऊत म्हणाले.

कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे व तपास यंत्रणांच्या धाडी त्या संदर्भात पडत आहेत. पण दौडच्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे व या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असेल तर ते गंभीर आहे.

भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे मुख्य सुत्रधार किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत आपण भीमा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घेऊ शकता. त्यांच्या कार्यालयात हे प्रकरण संबंधित तक्रारदार घेऊन गेले आहेत. पण किरीट सोमय्या त्या भ्रष्टाचारावर मूग गिळून बसलेत. जनतेच्या पैशांची प्रचंड लुटमार या कारखान्यात झाली आहे. हे सर्व प्रकरण तत्काळ ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या ताब्यात देऊन भीमा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग