मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Farmers Suicide : कृषीमंत्र्यांच्या सिल्लोडमध्ये आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या; आठवडाभरात सातवी घटना
सिल्लोडमध्ये पुन्हा शेतकऱ्याने संपवलं जीवन
सिल्लोडमध्ये पुन्हा शेतकऱ्याने संपवलं जीवन

Farmers Suicide : कृषीमंत्र्यांच्या सिल्लोडमध्ये आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या; आठवडाभरात सातवी घटना

13 March 2023, 9:51 ISTNinad Vijayrao Deshmukh

Farmers Suicide : शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर काही वेळातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये एका शेतकऱ्याने कर्जबाजारी आणि नापीकीला कंटाळून आत्महत्या केली. गेल्या आठवड्यात सात शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.

औरंगाबाद: राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठवाड्यात गेल्या आठवड्यात तब्बल सहा शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याची घटना ताजी असतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये कर्जबाजारीपणा आणि नापिकिला कंटाळून शेतकाऱ्याने आत्महत्या केली आहे. बोदवड येथील तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्यायल्याने त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी (दि १२) उपचारादरम्यान या शेतकऱ्याच्या मृत्यू झाला.

ट्रेंडिंग न्यूज

नंदू भिमराव लाठे (वय २८, रा.बोदवड ता.सिल्लोड) असे या शेतकऱ्याचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदू लाठे हा शेतात जातो असे सांगून शनिवारी घरातून निघून गेले. त्यांनी त्या ठिकाणी विषारी औषध प्यायले. रोज प्रमाणे नंदू दुपारी घरी न आल्याने घरचे त्याचा शोध घेण्यासाठी शेतात गेले. यावेळी तो शेतात बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचे दिसले. घरच्यांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्याने विषारी औषद प्यायल्याचे कळले. रविवारी उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. नंदू हा शेतात येणाऱ्या कमी उत्पन्नामुळे त्रासला होता. त्याच्यावर कर्ज देखील झाले होते. ते फेडता न आल्याने त्याने ही टोकाचे पाऊल उचलले असे बोलले जाते.

दरम्यान, ही घटना घडली असतांना कृषी मंत्री सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केले. शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असे म्हटल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या व्यक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्तार यांच्यावर टीका केली आहे.

विभाग