पुणे : पुण्यात कर्ज प्रक्रिया संदर्भातील फ्रेंचाइजी घेणे एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. काही भामट्यांनी एका व्यावसायिकाला तब्बल १ कोटी ३४ लाख ५४ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
या प्रकरणी याकुबअली ख्वाजा अहमद ऊर्फ याका (वय ४६, रा. हैदराबाद, तेलंगणा) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कॅम्प परिसरातील ३८ वर्षांच्या व्यावसायिकाने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली असून फसवणुकीची ही घटना फेब्रुवारी २०२२ ते आतापर्यंत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे व्यावसायिक आहे. त्यांचे पुण्यात शॉप आणि जागा आहेत. आरोपीने त्यांच्याकडील शॉप व जागा भाड्याने हवी आहे, असे सांगून संपर्क करत झायसोल इंटिग्रेटेड सोल्युशन प्रा. लि., या लोन प्रोसेसिंग संदर्भातील फ्रेंचाइजी देतो व त्याबदल्यात भरपूर पैसे मिळतील, असे आमिष फिर्यादीला दिले. या आमिषाला फिर्यादी बळी पडले. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून रोख पैसे, तर ऑफिस तयार करण्याच्या बहाण्याने एकूण वेळोवेळी १ कोटी ३४ लाख ५४ हजार रुपये घेतले. दरम्यान, गुंतवणूक केल्यानंतर कोणताही परतावा परत मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाली ही कळल्याने व्यावसायिकाने थेट पोलिसांत जात तक्रार दिली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या