Maharashtra Weather Update: राज्यात आज देखील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विशेषत: कोकणात आणि मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता आहे. तर काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रामुख्याने आज विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट व पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण आणि किनारपट्टीच्या भागात व मुंबईत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत असल्याने पुढील काही दिवस किनारपट्टीच्या भागात तापमान वाढणार आहे. आद्रता वाढल्यामुळे असह्य उकाडयाचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. पश्चिमी थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील तापमानात घट झाली असून उत्तर कोकणात तापमानात काहीशी घट होईल. तर मुंबईपासून दक्षिणेकडे असणाऱ्या किनारपट्टीवर वाढत्या तापमान घट होण्याची शक्यता आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज उद्या व २४ एप्रिलला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २३ व २५ एप्रिलला कोकण आणि गोवा वगळता उर्वरित राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणात आज पासून पुढील पाच दिवस उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच आज मेघ गर्जना आणि वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात वीजांचा कडकडाट वादळी वारे मेघ गर्जना आणि वीजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात आज वीजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह वादळी वारे वाहतील. आणि गारांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुण्यात आज अंशत: ढगाळ राहून मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश निरभ्र राहील.
मुंबईसह कोकण किनारपट्टीला पुन्हा तापमान वाढ सहन करावी लागणार आहे. उष्णतेबरोबर उकाडयाचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. अरबी समुद्रावरून आद्र्रतायुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत असल्यामुळे गुरुवार, २५ एप्रिलपर्यंत किनारपट्टीवर उकाडा जाणवेल. राज्याच्या अन्य भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
राज्याच्या अन्य भागात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाडयात तुरळक प्रमाणात गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भात रविवारीदेखील तापमान हे ४० अंशांवर होते. वाशिममध्ये राज्यातील ४३.६ अंश सेल्सिअस अशा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला रविवारी तापमानात थोडी घट झाल्याने नागरिकांना उकाडयापासून दिलासा मिळाला. कमाल तापमानात एक ते दीड अंशांनी घट झाली.