दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी रविवारी विरोधी आघाडी 'इंडिया'च्या 'उलगुलान न्याय' रॅलीला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलेले नाही. त्यांना शिक्षाही दिलेली नाही. तरीही पंतप्रधान मोदींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबले आहे. ही कसली चौकशी आहे, ज्यामध्ये दोषी सिद्ध झाले नसतानाही तुरुंगात टाकले जाते. ही हुकूमशाही आहे, देश हे सहन करणार नाही.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत चांगले काम केले आहे. त्यांचा काही दोष नसताना त्यांना जेलमध्ये टाकले आहे. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात योग्य प्रकारे औषधेही दिली जात नाहीत. त्यांना जेलमध्येच मारण्याचे सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप सुनीता केजरीवाल यांनी केला आहे.
सुनिता केजरीवाल म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांच्या आधी हेमंत सोरेन यांनाही जेलमध्ये टाकले. अरविंद केजरीवाल यांनी २००६ मध्ये आयआरएसची नोकरी सोडून समाजसेवा करू लागले. जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी दोनवेळा दीर्घ उपोषण केले. त्यांना मधुमेहाचा त्रास असल्याने डॉक्टरांनी त्यांना उपोषण न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी डॉक्टरांचे न ऐकता जनतेसाठी जीवावर उदार होऊन आंदलन केले. त्यांना सत्तेचा मोह नाही. त्यांना केवळ देशसेवा करायची आहे, असे सुनीता केजरीवाल म्हटले.
सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, मी तुम्हाला एक किस्सा सांगतो, जेव्हा आमचा विवाह ठरला होता, तेव्हा अरविंदजींनी मला एक प्रश्न विचारला होता. त्यांनी मला विचारले होते की, मला समाजाची सेवा करायची आहे, तुला काही अडचण आहे का. अशा व्यक्तीला यांनी तुरुंगात टाकले आहे. माझ्या पतीचा गुन्हा होता की, त्यांनी दिल्लीतील शाळांचा कायापालट केला, चांगले शिक्षण दिले, रुग्णालये बनवली, मुहल्ला क्लिनिक योजना सुरू केली. अरविंद केजरीवाल यांच्यात देशभक्ती ठासून भरली आहे.
सुनीता केजरीवाल यांनी म्हटले की, लोकांनी म्हटले की, राजकारण खूप गलिच्छ गोष्ट आहे. आणि हे खरेच आहे. राजकारण खूप घाणेरडी गोष्ट आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जेवणावरही कॅमेरा लावला आहे. त्यांच्या एका-एका घासावर नजर ठेवली जात आहे. अरविंद केजरीवाल मधुमेहाचे रुग्ण आहेत. ते गेल्या १२ वर्षापासून इन्सुलिन घेत आहेत. त्यांना दररोज ५० यूनिट इन्सुलिन गरजेचे आहे. मात्र तुरुंगात त्यांना इन्सुलिन घेऊ दिले जात नाही. हे लोक दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना अरविंद केजरीवालांचे विचार समजणार नाहीत.
संबंधित बातम्या