मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalgaon News: सुवर्ण नगरी जळगावातील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड; सापडलं मोठं घबाड!

Jalgaon News: सुवर्ण नगरी जळगावातील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड; सापडलं मोठं घबाड!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 21, 2024 11:38 PM IST

Income Tax Raid on Jewellers : जळगाव शहरातील आर सी बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा शोरुममध्ये,शनिवारी रात्री आयकर विभागाच्या पथकानं छापा मारून व्यवहाराची तपासणी केली.

जळगावातील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड
जळगावातील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड

jalgaon bafna jeweller raid : जळगाव सुवर्ण नगरीतील आणखी एक प्रसिद्ध ज्वेलर्स  इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आलं आहे. जळगाव शहरातील प्रसिद्ध सराफ दुकान रतनलाल सी बाफना ज्वेलर्सवर आयकर विभागाने धाड टाकून तपासणी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाक्या-नाक्यांवर तपासणी सुरू असताना ८ ते ९ किलो सोने आढळून आले. त्यानंतर आयकर विभागाने थेट जळगावमधील सराफ बाजारात पोहोचले. दरम्यान तपासणीत आढळलेले हे सोने आर सी बाफना ज्वेलर्सचे (Ratanlal c bafna Jewellers) असल्याची माहिती समोर आली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

जळगाव शहरातील आर सी बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा शोरुममध्ये, शनिवारी रात्री आयकर विभागाच्या पथकानं छापा मारून व्यवहाराची तपासणी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी करताना ८ ते ९ किलो सोने चौकशीत आढळून आले. हे सोने आर सी बाफना ज्वेलर्सचे असल्याची माहिती समोर आली आहे. 

आयकर विभागाने काही महिन्यांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध नीळकंठ ज्वेलर्सवर धाड टाकून चौकशी केली होती. पत्र्या मारुती चौकातील ज्वेलर्सची झाडाझडती करण्यात आली. हडपसर,  मगरपट्टा,  बाणेर भागातही आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. 

जळगाव शहरातील रतनलाल बाफना ज्वेलर्सचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने मुंबई येथून जळगाव शोरूमसाठी येत असतात. शनिवारी रात्रीच्या सुमारास सुरक्षा यंत्रणेसह ९ किलो सोन्याचे आणि १२ किलो चांदीचे दागिने औरंगाबाद आणि मुंबई येथून जळगावकडे येत होते.

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकेबंदी करण्यात आली आहे. पोलिसांकडून जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यादरम्यान दागिन्यांची वाहतूक करणारे वाहन अडविले होते. यावेळी तपासणीत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आढळून आल्याने पोलिसांनी याची माहिती आयकर विभागाला दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आयकर विभागाने रतनलाल सी बाफना ज्वेलर्स येथे या दागिन्यांच्या व्यवहाराबाबत तपासणी सुरू केली.

या कारवाईसाठी जळगाव आणि नाशिक येथील आयकर विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान रतनलाल बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी सांगितले की, आपल्याकडे येत असलेले सोन्याचे दागिने हे पूर्णपणे कायदेशीर मार्गाने येत होते. त्याची संपूर्ण माहिती पोलिसांना आणि आयकर विभागाला देण्यात आली आहे. या उत्तराने व पुरवलेल्या कागदपत्राने त्यांचे समाधान झाले असून चौकशीसाठी ताब्यात घेतलेले दागिने येत्या दोन ते तीन दिवसात परत दिले जातील. 

IPL_Entry_Point

विभाग