मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lok Sabha Election : 'अजित पवारांची दुसरी बायको....', हे काय बोलून गेले शेकापचे जयंत पाटील

Lok Sabha Election : 'अजित पवारांची दुसरी बायको....', हे काय बोलून गेले शेकापचे जयंत पाटील

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 28, 2024 05:56 PM IST

Jayant Patil On ajit Pawar : सुनील तटकरे म्हणजे अजित पवार यांची दुसरी बायको असल्याचं वादग्रस्त विधान शेकापचे जयंत पाटील यांनी केलं आहे. यावरून वाद निर्माणहोण्याची शक्यता आहे.

शेकापचे नेते जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंवर खालच्या पातळीवर टीका केली
शेकापचे नेते जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंवर खालच्या पातळीवर टीका केली

LokSabha : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय वातावारण तापत असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विरोधी नेते एकमेकांवर तुटून पडत आहेत. मुरुडमध्ये शेकापचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात शेकापचे जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सुनील तटकरे म्हणजे अजित पवार यांची दुसरी बायको असल्याचं वादग्रस्त विधान पाटील यांनी केलं आहे. यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

अजित पवार गटाने लोकसभेसाठी आपला पहिला उमेदवार जाहीर करताना सुनील तटकरे यांना रायगड मतदारसंघातून उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचं जागावाटप अद्याप जाहीर झालं नसताना अजित पवारांनी सर्वात आधी सुनील तटकरेंना उमेदवारी बहाल केली. 

मुरुड येथे मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाहोल केला. जयंत पाटील म्हणाले की, सुनील तटकरेंना त्यांचे भाऊ अनिल तटकरे यांनी पुढं आणलं. मात्र सुनील तटकरेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आता आपल्याला सुनील तटकरे पुन्हा निवडणुकीत उभं राहणार नाहीत, अशी स्थिती निर्माण करायची आहे. अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. 

दरम्यान यावेळी त्यांनी सुनील तटकरेंचा उल्लेख अजित पवारांची दुसरी पत्नी असा केला. सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको असं ते म्हणाले. पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी न करता नव्या उमेदीनं कामाला लागा, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. 

शेतकरी कामगार पक्ष दिलेला शब्द पाळणारा व कधीही न संपणारा पक्ष आहे. मागील वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये शेकापने अनेकांना निवडून आणले आहे. हा गरीबांची बांधिलकी जपणारा पक्ष आहे. याची जाणीव विरोधकांनी ठेवली पाहिजे.

IPL_Entry_Point