मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली संभाजीराजेंची माफी; म्हणाले “आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 02, 2024 08:30 PM IST

Uddhav Thackeray On Sambhajiraje : संभाजीराजेंबाबत मी चुकलो असेल तर शाहू छत्रपतींबाबत तुम्ही तीच चूक का करताय, आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही पण खाल्लं पाहिजे का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विरोधकांना केला आहे.

उद्धव ठाकरेंनी  भरसभेत  मागितली संभाजीराजेंची माफी
उद्धव ठाकरेंनी  भरसभेत  मागितली संभाजीराजेंची माफी

Uddhav Thackeray on Sambhaji Raje : महाविकास आघाडीची बुधवारी कोल्हापुरात विराट सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनीसंभाजीराजे छत्रपतींची (Chhatrapati sambhaji raje) माफी मागत शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, मी संभाजीराजेंबाबत चुकीचा वागलो, असं समजा, वागलो असेल तर मी जाहीर माफी मागतो. पण संभाजीराजेंबाबत मी चुकलो असेल तर शाहू छत्रपतींबाबत तुम्ही तीच चूक का करताय, आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही पण खाल्लं पाहिजे का, तुम्ही का त्यांना पाडायला उभे आहात का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विरोधकांना केला आहे. (Uddhav Thackeray apologizes to Chhatrapati sambhaji raje)

ट्रेंडिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संभाजीराजे छत्रपतींबाबत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. तुम्ही चुकीचं करत आहात. आम्ही बोट दाखवल्यावर उलटं बोट माझ्यावर दाखवता. आम्ही शेण खाल्लं असेल म्हणून तुम्ही शेण खाताय? आज शाहू महाराजांबद्दल मला वैयक्तिक आदर आहे, छत्रपती घराण्याबद्दल प्रेम आहे. कारण या व्यक्तीने मी कुणीतरी आहे असं जाणूनच दिले नाही. संभाजीराजेंबाबत काय निर्णय घेतला हे मला आणि संभाजीराजेंना माहिती आहे. त्याचा अर्थ आमची मैत्री आणि ऋणानुबंध तुटलेत असं होत नाही, असंही त्यांनी म्हटलं.

माझ्यात आणि संभाजीराजे यांच्यात जर दुरावा आला असेल तर त्यांनी सर्वांना सांगावे. मला एक कुणकुण लागली होती, जसा तुम्ही माझा संजय पाडला तसा जर दगाफटका संभाजीराजेंबाबत झाला असता तर पाप कुणाच्या माथी आलं असते? असा प्रतिसवालही उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत व मुख्यमंत्री शिंदेंना केला आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीवेळी संभाजीराजेंना शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. मात्र संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला होता. त्यानंतर छत्रपती घराण्याकडे वंशजाचे पुरावे मागून त्यांचा अपमान केल्याचे उदय सामंत म्हणाले. कोल्हापूरचं राजकारण वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. संभाजीराजेंना उमेदवारी का दिली नाही, नोटरी का करून घेत होते याची उत्तरे द्यावी अशी मागणी उदय सामंत यांनी ठाकरे गटाकडे केली होती.

सामंत म्हणाले की, त्याचा ड्राफ्ट लिहिला गेला, जवळपास ३ तास मी ड्राफ्ट लिहित होतो. त्यात जो मजकूर होता. ड्राफ्ट तयार झाल्यावर त्यावर नोटरी करावी असंही मला सांगण्यात आले होते. आज हे गादीचा मान दाखवतायेत, अशी दुटप्पी भूमिका कोल्हापूरकरांनी ओळखावी

 

IPL_Entry_Point