मराठी बातम्या  /  निवडणुका  /  ‘अग्निवीर ४ वर्षात निवृत्त आणि ७५ वर्षाच्या वृद्धाला पाहिजे तिसऱ्यांदा संधी’, लालुंच्या कन्येचा मोदींवर निशाणा

‘अग्निवीर ४ वर्षात निवृत्त आणि ७५ वर्षाच्या वृद्धाला पाहिजे तिसऱ्यांदा संधी’, लालुंच्या कन्येचा मोदींवर निशाणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 02, 2024 06:29 PM IST

Pm Narendra Modi : अग्निवीर योजनेत तरुण चार वर्षे सेवा करून निवृत्त होऊन घरात बसेल आणि हा ७५ वर्षाच्या वृद्ध पंतप्रधान आपल्यासाठी आणखी एक संधी मागत आहे, असा टोला राजद नेत्या मीसा भारती यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

मीसा भारतीचा मोदींवर निशाणा
मीसा भारतीचा मोदींवर निशाणा

आरजेडी चीफ लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पाटणा येथील बिहटा येथे प्रचार सभेला संबोधित करताना मीसा भारती यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. त्यांनी म्हटेल की. पंतप्रधान मोदींनी तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली आहे. त्यामध्ये तरुण चार वर्षे सेवा करून निवृत्त होऊन घरात बसेल आणि हा ७५ वर्षाच्या वृद्ध पंतप्रधान आपल्यासाठी आणखी एक संधी मागत आहे, मात्र जनता मूर्ख नाही.

ट्रेंडिंग न्यूज

मीसा भारतीने म्हटले की, लाकडाचे भांडे पुन्हा पुन्हा चुलीवर चढवले जात नाही. यावेळची निवडणूक सामान्य निवडणूक नसून देशाला वाचवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक आरक्षण आणि संविधान वाचवण्यासाठी आहे.

पाटलीपुत्रमधील आरजेडी उमेदवार मीसा भारतीने म्हटले की, भाजप नेते वारंवार ४०० पारचा नारा देत होते. मात्र आता हे नारे बंद झाले आहेत. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही हा नारा विसरले आहेत. कारण जनतेने त्यांच्या ४०० पारची पार हवा काढली आहे.

मीसा भारतीने पंतप्रधान मोदींना सवाल केला की, १० वर्षाच्या कार्यकाळात तुम्ही देशातील तरुणांसाठी काय केले? तुम्ही शेतकऱ्यांची मदत न करता भांडवलदारांची मदत केलीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता अंबानी-अदानीचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले.

याआधीही मीसा भारती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, जर देशातील जनतेने इंडिया आघाडीला संधी दिली तर पंतप्रधान मोदींसह भाजपने अनेक बडे नेते गजाआड होतील. यावरून वाद वाढल्यानंतर मीसा भारतीने मीडियावर आरोप करत म्हटले होते की, त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले होते.

लालू यादव यांची कन्या मीसा भारती सलग तिसऱ्यांदा पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्येही त्यांनी येथून निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही वेळी भाजपचे उमेदवार राम कृपाल यादव यांनी त्यांचा पराभव केला होता. आता तिसऱ्यांदाही भाजपचे राम कृपाल यादव आणि मीसा भारती आमने-सामने आहेत.

WhatsApp channel