Narendra Modi: "काँग्रेस इथं मरतेय अन् तिकडं पाकिस्तान रडतंय; राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तानात प्रार्थना-lok sabha elections 2024 pm narendra modi targeted rahul gandhi and pakistan in gujarat rally ,निवडणुका बातम्या
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Narendra Modi: "काँग्रेस इथं मरतेय अन् तिकडं पाकिस्तान रडतंय; राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तानात प्रार्थना

Narendra Modi: "काँग्रेस इथं मरतेय अन् तिकडं पाकिस्तान रडतंय; राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तानात प्रार्थना

May 02, 2024 05:34 PM IST

PM Narendra Modi On Rahul Gandhi : पाकिस्तानला भारतात कमकुवत सरकार हवं आहे, जसं २०१४ आधी होतं. इकडे काँग्रेस मरतेय अन् तिकडे पाकिस्तान रडतंय. तिकडचे नेते राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी प्रार्थना करत आहेत, अशा शब्दात मोदींनी काँग्रेस व पाकिस्तानवर निशाणा साधला.

राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तानात प्रार्थना, मोदींचा हल्ला
राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तानात प्रार्थना, मोदींचा हल्ला

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) देशभरात प्रचारसभा होत असून दिवसाला तीन ते चार सभा होत आहे. आज मोदींची गुजरातमधील आनंद येथे प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेस व राहुल गांधींवर (Rahul Gandhi)निशाणा साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत काँग्रेसवर हल्लाबोल केला.

काँग्रेसच्या राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावीळ असून तिकडे प्रार्थना केली जात आहे. इकडं काँग्रेस मरत असून तिकडे पाकिस्तान रडत आहे, अशी टीका त्यांनी केली. मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची काँग्रेसची इच्छा असल्याचा आरोपही मोदींनी यावेळी केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात काँग्रेस मरत आहे आणि तिकडे पाकिस्तान यामुळे रडत आहे.कारण पाकिस्तानला भारतात कमकुवत सरकार हवं आहे, जसं २०१४ पूर्वी सरकार होते. त्यावेळी मुंबईसह देशभरात दहशतवादी हल्ले झाले होते. भारतात काँग्रेसच्या सरकार काळात तिकडे पाकिस्तान मोठा होत गेला. मात्र आता पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. त्यांच्या दहशतवादाचे टायर पंक्चर झाले आहे. कधीकाळी भारतासह जगभरात दहशतवाद्यांची निर्यात करणारा देश आताआटा आणि धान्याच्यासाठी अन्य देशांकडे कटोरा घेऊन फिरत आहे. आता पाकिस्तानी नेते काँग्रेससाठी प्रार्थना करत आहेत. पाकिस्तानकाँग्रेसच्याराजपुत्राला पंतप्रधान करण्यासाठी उतावीळ झाला आहे. पाकिस्तान आणि काँग्रेसमधील भागीदारी आता उघड झाली आहे.

मोदी म्हणाले की, देशाचे संविधान बदलून मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची काँग्रेसची योजना आहे. मुस्लिम व्होट बँकेवर अन्य पक्षांनी दावा ठोकल्यानंतर त्यांना असे करणे भाग आहे. मोदींनी जाहीर सभेत काँग्रेस आणि राहुल गांधी यांना तीन आव्हाने देत याचे उत्तर लेखी देण्यास सांगितले आहे.

मोदी म्हणाले काँग्रेससाठी पहिले आव्हान आहे राज्यघटना बदलून मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही, अशी लेखी हमी काँग्रेसने देशाला द्यावी.

त्यांनी दुसरे आव्हान दिले की, एससी-एसटी आणि ओबीसींना दिलेल्या आरक्षणात काँग्रेसने कोणताही अडथळा येणार नाही, हे लिहून द्यावे.

 

तिसरे आव्हान म्हणजे, काँग्रेसने देशाला लेखी हमी द्यावी की ज्या राज्यांमध्ये काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेत आहेत ते कधीही वोट बँकेचे राजकारण करून ओबीसी कोट्यातून मुस्लिमांना आरक्षण देणार नाहीत.

Whats_app_banner