Ramdas Athawale : "नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा, कारण आम्हाला..”, रामदास आठवलेंचा ‘मविआ’ला टोला
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Ramdas Athawale : "नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा, कारण आम्हाला..”, रामदास आठवलेंचा ‘मविआ’ला टोला

Ramdas Athawale : "नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा, कारण आम्हाला..”, रामदास आठवलेंचा ‘मविआ’ला टोला

May 01, 2024 09:16 PM IST

Ramdas Athawale News : नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा... कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा..., असे आठवले यांनी म्हटले आहे.

रामदास आठवलेंची महाविकास आघाडीवर टीका
रामदास आठवलेंची महाविकास आघाडीवर टीका

Ramdas Athawale News : लोकसभा निवडणुकीचा (Lok sabha election 2024) तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) महाराष्ट्राच सभांचा धडाका लावला आहे. त्यांनी पुण्यातील सभेतून शरद पवारांवर पातळी सोडून टीका करताना त्यांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भटकती आत्मावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या खास शैलीत याचा समाचार घेत, मोदींना वखवखलेला आत्मा संबोधते. यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी चारोळीतून महाविकास आघाडीला चिमटा काढला आहे.

विरोधक लोकशाही धोक्यात आल्याचे म्हणतात. लोकशाही जर धोक्यात असती तर मोदी मते मागायला आले असते का? अशी विचारणा रामदास आठवले यांनी केली आहे. नरेंद्र मोदींचा वखवखलेला आत्मा भटकत आहे, असे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणतात. राऊतांनी राज्याचा खेळ खंडोबा यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी केवळ आरोप करण्यासाठी ठेवले आहे.. जे रोज करत आहेत खोके-खोके, त्यांचे सरकले आहे डोके... नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा... कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा..., असे आठवले यांनी म्हटले आहे.

आठवले म्हणाले, आपला देश संविधानानुसार चालतो. जर हे कुणाला मान्य नसेल आणि संविधान मान्य नसेल तर आम्ही त्यांना चलेजाव सांगत आहोत. मी देशातील १७ राज्यांचा दौरा केला असून वातावरण आमच्या बाजूने आहे. उत्तर भारताबरोबरच तामिळनाडूतही एनडीएच्या जागा निवडून येतील. आमच्या नाऱ्याप्रमाणे एनडीए ४०० हून अधिक जागा जिंकणार आहे. आम्ही संविधान बदलणार नाही, गैरसमज पसरवू नका. मला जरी तिकीट दिलेले नाही, तरीही मी त्यांच्या बरोबर आहे. मी राज्यसभेवर आहे. पण आम्हाला एकतरी जागा मिळावी अशी अपेक्षा होती, अशी खंतही रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

 

दरम्यान भटकती आत्मावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात वार-पलटवार सुरू झाले आहेत. शरद पवारांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की, होय मी भटकती आत्मा आहे, जनतेच्या हितासाठी त्यांच्या कल्याणासाठी मी शंभर वेळा अस्वस्थ राहीन. गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय, असा टोला संजय राऊतांनी मोदींना लगावला. तर शरद पवारच महाराष्ट्राचा आत्मा असल्याचे जयंत पाटलांनी म्हटले आहे.

Whats_app_banner