Porn Video Making Racket Busted In Lonavala : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. पॉर्न व्हिडिओ तयार करण्यास बंदी असतांना देखील लोणावळा येथे एक व्हीला भाड्याने घेत काही ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी पॉर्न व्हिडिओ तयार करणारे रॅकेट पुणे ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे.
ही टोळी वेगवेगळ्या राज्यांतून आली असून काही तरुण आणि तरुणी या ठिकाणी पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. यातील काही व्हिडिओ पोलिसांना मिळाले असून १५ पैकी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
भारतात पॉर्न व्हिडिओ तयार करणे कायद्याने गुन्हा आहे. लोणावळ्यात एका व्हीलात पॉर्न व्हिडिओ तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यात परदेशातील टोळी सक्रिय असल्याची देखील पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली. या ठिकाणी काही अश्लील ओ.टी.टी प्लॅटफॉर्मसाठी दुसऱ्या राज्यातून आलेले तरुण व तरुणी हे पॉर्न व्हिडिओ तयार करत होते.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने या व्हीलावर छापा टाकला. यावेळी या ठिकाणी १५ जणांची टोळी पॉर्न व्हिडिओ तयार करत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले असून यातील १३ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी पाच तरुणी आहेत. हे सर्व भारतातील विविध राज्यांतील आहेत.
पॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य पोलिसांनी घटणस्थळावरून जप्त केले आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक तसेच सत्यसाई कार्तिक यांच्या सूचनेनुसार ही मोठी कारवाई करण्यात आली.