BOI Recruitment 2024 : बँक ऑफ इंडियाने अधिकारी पदांच्या १४३ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार BOI bankofindia.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.
बँक ऑफ इंडियाच्या या भरती प्रक्रियेत विविध रिक्त पदांसाठी श्रीणी पाचच्या पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी उमेदवारांना अर्जाची पात्रता, अर्जाच्या अटी, निवड प्रक्रिया इत्यादी तपशीलवार माहितीसाठी संपूर्ण भरती अधिसूचना वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया २७ मार्च २०२४ पासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही १० एप्रिल २०१४ पर्यंत राहणार आहे.
- ऑनलाइन अर्जाची सुरुवात २७ मार्च २०२४
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२४
विविध प्रवाहांमधील रिक्त पदांसाठी अर्जाची पात्रता भिन्न असू शकते. अधिक माहितीसाठी उमेदवारांना संकेतस्थळावर दिलेली संपूर्ण भरती अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
बँक ऑफ इंडियाच्या या रिक्त जागेसाठी, सामान्य आणि इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी ८५९ रुपये शुल्क आहे. तर एससी, एससी, एसटी आणि अपंगांसाठी १७५ रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. अर्ज फी मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्ड किंवा रुपे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे जमा केली जाऊ शकते. उमेदवार UPI आणि मोबाईल वॉलेटद्वारे देखील पेमेंट करू शकतात. अधिक माहितीसाठी बँक ऑफ इंडियाची वेबसाइट पहा.
पात्र उमेदवारांची ऑनलाइन लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. बँकेने सांगितले की निवड प्रक्रिया अर्जांची संख्या आणि पात्र उमेदवारांच्या संख्येवर अवलंबून असेल. भरतीसाठी ऑनलाइन लेखी परीक्षेत इंग्रजी भाषा, संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक प्रवीणता, सामान्य ज्ञान आणि बँकिंगशी संबंधित प्रश्न विचारले जातील. इंग्रजी भाषा वगळता इतर सर्व विषयांचे प्रश्न हिंदी आणि इंग्रजी भाषेत असतील. इंग्रजी परीक्षा ही पात्रता स्वरूपाची असेल, म्हणजेच गुणवत्ता यादीत इंग्रजीचे गुण समाविष्ट केले जाणार नाहीत.