Mukhtar Ansari Case: गुन्हेगारीच्या दहशतीचा प्रवास संपला, हजारोंच्या उपस्थितीत मुख्तार अन्सारीवर अंत्यसंस्कार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mukhtar Ansari Case: गुन्हेगारीच्या दहशतीचा प्रवास संपला, हजारोंच्या उपस्थितीत मुख्तार अन्सारीवर अंत्यसंस्कार

Mukhtar Ansari Case: गुन्हेगारीच्या दहशतीचा प्रवास संपला, हजारोंच्या उपस्थितीत मुख्तार अन्सारीवर अंत्यसंस्कार

Updated Mar 30, 2024 01:06 PM IST

Mukhtar Ansari Case : अट्टल गुन्हेगार मुख्तार अन्सारी यांना गाझीपूरच्या कालीबाग स्मशानभूमीत पुरण्यात आले आहे. मुख्तारवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, मुलगा उमरने शेवटच्या वेळी त्याच्या वडिलांच्या मिशीला पीळ देतांना दिसला.

गुन्हेगारीच्या दहशतीचा प्रवास संपला, हजारोंच्या उपस्थितीत मुख्तार अन्सारीवर अंत्यसंस्कार
गुन्हेगारीच्या दहशतीचा प्रवास संपला, हजारोंच्या उपस्थितीत मुख्तार अन्सारीवर अंत्यसंस्कार

Mukhtar Ansari Case : गेले अनेक दशके उत्तर प्रदेशात दहशत माजवणारा गुंड मुख्तार अन्सारी याचा मृतदेह गाझीपूरच्या कालीबाग स्मशानभूमीत दफन करण्यात आला. मुख्तारवर अन्सारीवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, मुलगा उमरने शेवटच्या वेळी त्याच्या वडिलांच्या मिशीला पीळ देतांना दिसला. मुख्तार अन्सारीला त्याच्या मिशा खूप प्रिय होत्या. बोलत असतांना अनेकदा मिशीला पीळ देण्याची त्याची सवय होती. त्याच्या दफनविधी वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते.

उत्तर प्रदेशात दहशत माजवणाऱ्या माफियांचा भयानक शेवट! मुख्तारसह ९ अट्टल गुन्हेगारांचा भयानक झाला मृत्यू

वडिलांच्या मिशांना पीळ देतांनाचा मुलगा उमरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्तार अन्सारीप्रमाणेच त्यांची दोन्ही मुले अब्बास अन्सारी आणि उमर अन्सारी मिशा ठेवतात. अब्बास अन्सारीही अनेकदा मिशी पिळतांना दिसतो. मात्र, अब्बास अन्सारी शनिवारी मुख्तार यांच्या अखेरच्या यात्रेला उपस्थित राहू शकला नाही. त्याच्या परवानगीसाठी अब्बास यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्याला परवानगी मिळाली नाही.

Puneri Patya : लोकसभा निवडणुकीत पुण्यात पुन्हा पुणेरी पाट्या चर्चेत; विकास नको पण उमेदवारांकडून हवे आहे 'हे' वचन

मुख्तारच्या अखेरच्या प्रवासाला फक्त भाऊ अफजल अन्सारी, धाकटा मुलगा उमर अन्सारी आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित राहू शकले. यावेळी अन्सारीची फरार पत्नी अफशानही देखील उपस्थित नव्हती. दरम्यान, शनिवारी मुख्तारच्या अंत्ययात्रेच्या आधी उमर अन्सारीने वडिलांच्या पार्थिवाचे दर्शन घेत अन्सारीच्या मिशीला शेवटचा स्पर्श करत पीळ दिला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

PHOTOS: घरापेक्षाही आलिशान आहे आलिया भट्टची व्हॅनिटी व्हॅन, पाहा फोटो

मुख्तार अन्सारीच्या निधनाने त्यांचा मोठा भाऊ खासदार अफजल अन्सारी यांना धक्का बसला आहे. गुरुवारी संध्याकाळी मुख्तारच्या मृत्यूची बातमी आल्यापासून ते घराबाहेर पडले नाहीत. शनिवारी, मुख्तार अन्सारीच्या अंत्यसंस्कारा प्रसंगी ते उपस्थित राहिले. यावेळी स्मशानभूमीत जमलेल्या प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन करताना अफजल दिसला.

सपाचे सर्व आमदार आणि अधिकारी देखील अंत्यसंस्काराप्रसंगी पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफजलचा रक्तदाब वाढला होता. मुख्तारचा गुंडगिरीच्या बळावर अफझलची ताकद आणखी वाढली. मुख्तार यांच्या ताकदीमुळे अफजल अन्सारी सलग पाचवेळा मुहम्मदाबादमधून आमदार म्हणून निवडून आले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर