मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लोकल, मेट्रोनंतर आता एअरपोर्टवरही स्टंटबाजी, रिल्स बनवण्यासाठी लगेज बेल्टवर झोपली तरुणी, VIDEO Viral

लोकल, मेट्रोनंतर आता एअरपोर्टवरही स्टंटबाजी, रिल्स बनवण्यासाठी लगेज बेल्टवर झोपली तरुणी, VIDEO Viral

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 30, 2024 01:25 PM IST

Viral Video : मेट्रो, लोकल ट्रेननंतर आता एअरपोर्टवरही रील बनवले जाऊ लागले आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तरुणीचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल
तरुणीचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल

Viral Airport Video :सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात रिल्स बनवण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात.यासाठी ते आपला जीवही धोक्यात घालत असतात. मेट्रो, लोकल ट्रेननंतर आता एअरपोर्टवरही रील बनवले जाऊ लागले आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की, एक तरुणी एअरपोर्ट वर रील बनवत आहे. इतकेच नाही तर रील बनवण्यासाठी ती एअरपोर्टवर प्रवाशांचे सामान आणणाऱ्या लगेज बेल्टवर झोपली. हा व्हिडिओ पाहून इंटरनेट यूजर्स संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

ही मुलगी ‘कुछ-कुछ होता है’ गाण्यावर रील बनवत आहे. रील बनवताना ती सामान ठेवण्याच्या लगेज बेल्टवर झोपली. लोकांना हे खूपच फनी वाटत आहे. फी फनी लगा रहा है. हा व्हिडिओ पाहून यूजर्स तरुणीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

एका यूजरने म्हटले आहे, तरुणीवर कारवाई झाली पाहिजे. एक अन्य यूजर लिहिले की, छपरी कुठेही पोहचतात. आणखी एकाने लिहिले हा व्हायरस येथपर्यंत पोहोचला आहे. या पोस्टवर अनेक युजर्स आपला राग व्यक्त करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग