vasai fort leopard capture: वसई किल्ल्यात एका बिबट्याने गेल्या २५ दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या बिबट्याने काही पाळीव प्राण्यांवर देखील हल्ला केला होता. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, गेल्या २९ मार्च पासून बिबट्या वनविभागाला गुंगारा देत होता. अखेर हा बिबट्या बिबट्या मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
वसई किल्ल्यात २९ गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. हा बिबट्या नागरिकांना दिसला होता. या बाबत २९ मार्चला येथे राहणाऱ्या नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली होती. दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने येथे पिंजरा देखील लावला होता. मात्र, बिबट्या या पिंजऱ्याकडे फिरकत नव्हता. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. येथील नागरिक बिबट्याच्या दहशीत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच या किल्यावरील पर्यटन देखील बंद करण्यात आले होते.
या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग देखील शर्थीचे प्रयत्न करत होते. या साठी किल्ल्या ट्रॅप कॅमेरे, रेस्क्यू पथक, तसेच काही ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. परंतु मानवी वर्दळ व इतर अडचणीमुळे हा बिबट्या २० ते २५ दिवस उलटूनही वनविभागाच्या जाळ्यात अडकला नव्हता. त्यामुळे वनविभागाने बिबट्या पकडण्याच्या नियोजनात थोडा बदल करून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले आणि त्यानुसार पिंजरे देखील लावले.
मंगळवारी पहाटे अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात येऊन अडकला. २५ दिवसांनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या जेरबंद झाल्याने गेल्या महिनाभरापासून दहशतीत असलेले वसई किल्ल्याच्या परिसरातील नागरिकांची दहशत आता दूर झाली आहे.
वसई किल्ला परिसरात अनेक झाडी आहेत. तसेच या ठिकाणी जंगल असल्याने जंगलातून हा बिबट्या किल्ला परिसरातील मानवी वस्तीत आला, सवा असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी लावला आहे.